किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, २९ ऑक्टोबर – केदारनाथ येथील आदि शंकराचार्यांच्या समाधिस्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी आपल्या केदारनाथ यात्रेदरम्यान हे उद्घाटन करणार असून, यावेळी ते शंकराचार्यांच्या पुतळ्याचेही अनावरण करतील. केदारनाथमध्ये २०१३ साली आलेल्या प्रलयात ही समाधी उद्ध्वस्त झाली होती.
पंतप्रधान कार्यालयाने शंकराचार्यांच्या समाधिस्थळाचे पुनर्निर्माण केले आहे. पंतप्रधानांच्या देखरेखीत हे पुनर्निर्माणाचे कार्य झाले आहे. पंतप्रधान यावेळी सरस्वती आस्थापथाच्या कामाचाही आढावा घेतील आणि सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी तेथे आयोजित सार्वजनिक सभेलाही संबोधित करतील. याप्रसंगी केदारनाथ येथील पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. यात, सरस्वती काठाला लागून असलेला भक्तिमार्ग आणि घाट, मंदाकिनी नदीला लागून असलेला भक्तिमार्ग, तीर्थ पुरोहितांची घरे आणि मंदाकिनी नदीवर बांधलेला गरुड छत्ती पूल या कामांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी १३० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाला आहे. तसेच १८० कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणार्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजनदेखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. संगम घाटाचे नूतनीकरण, पर्यटक सुविधा आणि प्रथमोपचार केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णालय, दोन अतिथीगृह, पोलिस स्थानके, आदेश आणि नियंत्रण केंद्र, मंदाकिनी भक्तिमार्ग मार्गिका व्यवस्थापन आणि पाऊस निवारा तसेच, सरस्वती नागरी सुविधा इमारत आदी विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे.