किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलबांगलादेश संदर्भात सहसरकार्यवाह अरुण कुमार यांचे प्रतिपादन,
धारवाड, २९ ऑक्टोबर – बांगलादेशात हिंदू समाजावर झालेले आक्रमण ही अचानक घडलेली घटना नाही. खोट्या बातमीच्या आधारावर सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हिंदू समाजाच्या निर्मूलनाचा योजनाबद्ध प्रयत्न होता, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार यांनी कार्यकारी मंडळाच्या दुसर्या दिवशीच्या बैठकीनंतर पत्रपरिषदेत बोलताना दिली. यावेळी अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हेही उपस्थित होते. ही बैठक कर्नाटकच्या धारवाड येथे सुरू आहे.
यावेळी बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या नृशंस हल्ल्याच्या घटनेवर प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रस्तावात हिंदूंवर झालेल्या हिंसक आक्रमणांवर खेद व्यक्त करण्यात आला. तेथील हिंदू अल्पसंख्यकांवर वारंवार होत असलेल्या क्रूर हिंसा आणि बांगलादेशाच्या व्यापक इस्लामीकरणाच्या जिहादी संघटनांच्या षडयंत्राचा तीव्र निषेध करण्यात आला.
प्रस्तावात असे म्हटले आहे की, हिंदू समाजाला लक्ष्य करून वारंवार होत असलेल्या हिंसेचा वास्तविक उद्देश बांगलादेशातून हिंदू समाजाचे संपूर्णपणे निर्मूलन करणे हे आहे. परिणामी फाळणीच्या काळापासूनच हिंदू समाजाची लोकसंख्या निरंतर लोप पावत आहे. फाळणीच्या वेळी पूर्व बंगालमध्ये हिंदूंची लोकसंख्या जवळपास २८ टक्के होती, ती कमी होऊन आता जेमतेम ८ टक्के झाली आहे. जमात-ए-इस्लामीसारख्या (बांगलादेश) कट्टरपंथी इस्लामी समूहांद्वारा होत असलेल्या अत्याचारांमुळे फाळणीपासून, विशेषत: १९७१ च्या युद्धाच्यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाजाला भारतात पलायन करावे लागले.
संघाने मानवाधिकाराच्या तथाकथित प्रहरी संघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संस्थांच्या मौनावर चिंता व्यक्त केली असून, आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे की, या हिंसेचा निषेध करण्यासाठी पुढे यावे तसेच बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि अन्य अल्पसंख्यक समाजाच्या बचाव व सुरक्षेसाठी आवाज उठवावा. बांगलादेश किंवा जगातील कोणत्याही अन्य भागात कट्टरपंथी इस्लामिक शक्तीचा उदय जगातील शांतताप्रिय देशांच्या लोकशाही व्यवस्था आणि मानवाधिकाराकरिता गंभीर धोका उत्पन्न करेल.
प्रस्तावात अत्याचारग्रस्त कुटुंबांच्या मदतीकरिता पुढे आलेल्या इस्कॉन, रामकृष्ण मिशन, भारत सेवाश्रम संघ, विश्व हिंदू परिषद तसेच अनेक हिंदू संघटनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यकारी मंडळाने भारत सरकारला निवेदन केले आहे की, उपलब्ध सर्व राजनयिक माध्यमांचा उपयोग करून बांगलादेशात होत असलेल्या आक्रमण आणि मानवाधिकारांच्या अध:पतनाविषयी जगभरातील हिंदू समाज आणि संस्था यांना असणार्या काळजीच्या बाबतीत बांगलादेश सरकारला अवगत करावे; जेणेकरून तेथील हिंदू आणि बौद्ध समाजाची सुरक्षा सुनिश्चित होऊ शकेल.
मार्च महिन्यातील बैठकीत या सर्वांना पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, समरसता, सामाजिक सद्भाव या कार्यासोबत जोडण्याविषयी विचार झाला होता. हे चारही समाजाचे उपक्रम होतील, यादृष्टीने काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते. आतापर्यंत झालेले प्रयत्न आणि अनुभवांची समीक्षा बैठकीत झाली. तसेच, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त काय काय करता येईल आणि काय करायला हवे, याविषयीसुद्धा बैठकीत चर्चा आणि समीक्षा करण्यात आली. बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या इस्लामी आक्रमणाचा निषेध करून प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
श्रीराम जन्मभूमी निधी समर्पणात लाखोंचा सहभाग
श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानात धन मिळविणे हा संघाचा मुख्य उद्देश नव्हता. न्यासाच्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देतीलच; आंदोलनाप्रमाणेच या अभियानात संपूर्ण समाजाचा सहभाग असेल. त्यामुळे यावेळेससुद्धा समाजातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित केले गेले. देशातील सुमारे ६.५ लाख गावांपैकी ५.३४ लाख गावांपर्यंत कार्यकर्ते पोहोचले. सर्व नगरांच्या सर्व वस्त्यांपर्यंत पोहोचले. अभियानात १२.७३ कोटी कुटुंबांपर्यंत कार्यकर्ते पोहोचले. अभियानात केवळ संघाच्या कार्यकर्त्यांनी काम केले असे नव्हे, तर समाजामध्ये स्वयंप्रेरणेने खूप मोठ्या संख्येने नागरिक जमले. अभियानात २५ ते ३० लाख महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे, कोरोनाकाळात आव्हानेसुद्धा वाढली होती. सर्व नागरिकांनी मिळून काम केले. अनेक स्वयंसेवक आमच्यासोबत जोडले गेले आणि संघासोबत काम करू इच्छित होते. या लोकांनी स्थायी रूपात आपल्या कामाशी जोडावे, असा विचार मार्चच्या बैठकीत झाला होता. या बैठकीत कार्य विस्ताराच्या दृष्टीनेसुद्धा समीक्षा झाली, असेही ते म्हणाले.