किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, ३० ऑक्टोबर – यंदा दिवाळीपूर्वीच भारतीयांनी चीनला दणका दिला असून, स्वदेशी वस्तूंचा स्वीकार आणि चिनी मालावर बहिष्कार या धोरणामुळे ड्रॅगनला सुमारे ५० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे.
गतवर्षीही ग्राहकांनी चिनी मालाकडे पाठ फिरविली होती. यंदा व्यापार्यांनी चिनी माल आयात न करता स्वदेशी मालाचा भरपूर साठा ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे, असे अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनामुळे सणासुदीच्या हंगामात चीनच्या व्यापारात ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या काळात देशांतर्गत विक्री वाढणार असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटींची वाढ होईल.
२० शहरांत सर्वेक्षण
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया म्हणाले की, आमच्या संघटनेच्या रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट सोसायटीने अनेक राज्यातील २० प्रमुख शहरांमध्ये नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. यात नवी दिल्ली, मुंबई, नागपूर, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, रायपूर, चंदीगड, भुवनेश्वर, गुवाहाटी, पाटणा, चेन्नई, हैदराबाद, भोपाळ, जम्मू आदी शहरांचा समावेश आहे.
दरवर्षी राखी ते नवीन वर्ष या पाच महिन्यांच्या सणासुदीच्या काळात भारतीय व्यापारी आणि निर्यातदार चीनमधून सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात करतात. यावर्षी राखी सणाच्या वेळी चीनमध्ये सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान, झाले तर गणेश चतुथींला ५०० कोटींचे नुकसान झाले. आता दिवाळीतही हाच कल दिसून येत आहे. सध्याच्या दिवाळीत देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वाढती संख्या पाहता व्यापारी वर्गाला मोठ्या व्यवसायाची अपेक्षा आहे. स्वदेशीच्या आवाहनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही देशातील व्यापारी आणि आयातदारांनी चीनमधून होणारी आयात बंद केली आहे. गेल्या वर्षीपासून ग्राहकही चिनी वस्तूंच्या खरेदीत रस घेत नाहीत. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता आहे.