किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 32.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 38 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.99° से.
27.3°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलधारवाड, ३० ऑक्टोबर – देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने संघाचे स्वयंसेवक समाज व विभिन्न संस्थांसोबत एकत्रित रीत्या काम करतील, तसेच विविध उपक्रमांचे आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य चळवळीतील अनाम क्रांतिकारकांचे जीवन समाजासमोर आणण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आज शनिवारी येथे दिली. धारवाड येथे आयोजित रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीचा समारोप आज झाला, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषद होसबळे बोलत होते. यावेळी अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते.
काळ्यापाण्याची शिक्षा भोगणार्या क्रांतिकारकांबद्दल समाज अनभिज्ञ आहे. अशा क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रदर्शन आयोजित करणे, तामिळनाडूतील वेलू नाचियार, कर्नाटकातील अबक्का, राणी गांदीलु यांच्याबद्दल माहिती नाही, त्यांचे जीवन समाजासमोर आणणे. असे काही उपक्रम अमृत महोत्सवानिमित्त होणार आहेत, असे सांगून ते म्हणाले की, भारतातील स्वातंत्र्य चळवळ जगात वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. स्वातंत्र्य आंदोलन सर्वाधिक काळ चालले. स्वातंत्र्य आंदोलनात देशाची एकात्मता ठळकपणे दिसून आली. ही स्वातंत्र्य चळवळ केवळ इंग्रजांविरोधात नव्हती, तर ती भारताचे ‘स्व’त्व जागृत करणारी चळवळ होती. याकरिता यामध्ये स्वदेशी, स्व-भाषा, स्व-संस्कृतीचा समावेश झाला. त्यामुळे भारताच्या ‘स्व’चा अर्थ इंग्रजांना येथून केवळ हाकलणे, एवढाच नव्हता तर, भारताचा आत्मा जागृत करण्याचा होता. याकरिता स्वामी विवेकानंदांसह अनेक महान पुरुषांनी मोलाची कामगिरी बजावली. यानिमित्ताने सध्याच्या पिढीने भारताला प्रत्येक क्षेत्रात जगात उत्कृष्ट बनविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा मनाशी संकल्प करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकार्यवाह म्हणाले की, शीख पंथाचे नववे गुरू तेगबहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशवर्षाच्या निमित्ताने विविध संस्थांच्या सहयोगाने कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरू तेगबहादूर यांनी धर्म संस्कृतीच्या रक्षणाकरिता बलिदान दिले होते. त्यांची स्मृती आणि प्रेरणा सध्याच्या पिढीला माहिती व्हायला हवी.
ते म्हणाले की, कार्यकारी मंडळाच्या वर्षभरात दोन वेळा बैठका होतात, एक प्रतिनिधी सभेपूर्वी होते तर, दुसरी दिवाळी आणि दसर्याच्या दरम्यान होते. आता होणारी बैठक ही तीन दिवसीय बैठक असते. कोरोनामुळे मागच्या वर्षी बैठक होऊ शकली नव्हती. कोरोना काळात संघाच्या स्वयंसेवकांनी लाखोंच्या संख्येने सेवाकार्य केले. कोरोनामुळे संघकार्याच्या विस्तारातदेखील अडथळा आला, शाखा व्यवस्थित लागू शकल्या नाहीत, देशभरातील प्रवासातही अनेक अडचणी आल्या. शाखेच्या रूपात प्रत्यक्ष कार्य प्रभावित झाले, मात्र सेवेच्या रूपात व्यापक कार्य झाले. नित्य शाखेत येणार्या स्वयंसेवकांसोबतच केवळ कार्यक्रमात येणार्या स्वयंसेवकांनीदेखील अत्याधिक सक्रियतेने कार्य केले.
होसबळे म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर येणार्या तिसर्या लाटेची शक्यता पाहता त्याच्याशी सामना करण्याच्या तयारीच्या दृष्टीने प्रत्येक राज्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जर तिसर्या लाटेची परिस्थिती ओढावलीच तर समाजाच्या सहयोगाने त्याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार आहोत. परमेश्वराकडे प्रार्थना आहे की, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, पण तिसरी लाट आलीच तर, परिस्थितीशी सामना करण्यास आपण सज्ज आहोत.
रोजगार निर्मितीतही स्वयंसेवक कार्यरत
दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, कोरोनामुळे शिक्षण आणि रोजगारावर दुष्परिणाम झाला. लोकांच्या स्वावलंबनाकरिता स्वयंसेवकांनी कार्यप्रारंभ केले आहे. कौशल्य प्रशिक्षण, स्थानिक नागरिकांद्वारे उत्पादित वस्तूंचे मार्केटिंग, बँक कर्ज उपलब्ध करणे आदी रोजगार निर्मितीच्या कार्यात स्वयंसेवक सहकार्य करीत आहेत. आगामी काळात यावर विशेष लक्ष देऊन प्रयत्न करणार आहोत.
लोकसंख्या धोरणाबद्दलच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, प्रत्येक देशात लोकसंख्या धोरण निश्चित व्हायला हवे आणि ते समाजातील सर्व वर्गांना सामाईक पद्धतीने लागू व्हायला हवे. नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता लक्षात घेऊन लोकसंख्याविषयक धोरण तयार करायला हवे. याबाबत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी संघाद्वारे पूर्वी संमत झालेल्या प्रस्तावाविषयी आधारावरच पुन्हा स्मरण केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पर्यावरण संरक्षण हे प्रत्येक दिवसाचे कार्य आहे, केवळ दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणून समस्येवर तोडगा निघू शकेल का, यामुळे समस्येचे निराकरण होऊ शकणार नाही. जगातील अनेक देशांत फटाक्यांचा वापर केला जातो. यामुळे, कोणत्या प्रकारच्या फटाक्यांवर बंदी आणायला हवी, हे पाहायला हवे. समग्रतेने विषय पाहायला हवा, यावर लगेचच निर्णय होऊ शकत नाही. समग्रतेने आणि वेळोवेळी यावर चर्चा व्हायला हवी. यामुळे मिळणार्या रोजगाराविषयीही विचार करायला हवा.
कोणत्याही प्रकारे संख्या वाढविणे, फसवणुकीतून, प्रलोभनातून धर्मांतरण करणे योग्य नाही. हे स्वीकारार्ह नाही. धर्मांतरण विरोधी विधेयकाला विरोध का होत आहे, हे सगळ्यांसमोर आहे. हिमाचलात कॉंग्रेस सरकारने धर्मांतरण विरोधी विधेयक पारित केले, अरुणाचलात कॉंग्रेस सरकारने अनुभवाच्या आधारावर कायदा संमत केला. याकरिता धर्मांतरण थांबविले पाहिजे आणि ज्या लोकांनी धर्मांतरण केले आहे, त्यांनी ते जाहीर करायला हवे. ते दोन्ही बाजूने लाभ घेऊ शकत नाहीत. सरकार्यवाह म्हणाले, जर धर्मांतरण थांबविण्यासाठी कायदा झाला तर, आम्ही त्याचे स्वागत करू.
संघ कार्य मंडळस्तरांपर्यंत पोहोचविणार
३४ हजार ठिकाणी दैनिक शाखा, साप्ताहिक मिलन १२,७८० ठिकाणांवर, मासिक मंडली ७,९०० ठिकाणी, एकूणच ५५ हजार ठिकाणी संघाचे प्रत्यक्ष कार्य आहे. सध्या देशभरात ५४,३८२ दैनिक शाखा लागत आहेत.
वर्ष २०२५ मध्ये रा. स्व. संघ स्थापनेस १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक तीन वर्षांत संघटन विस्ताराची योजना तयार करीत आहोत. या दृष्टीने आम्ही विचार केला आहे की, मंडळ स्तरावर आपले काम व्हायला हवे. आता देशात ६,४८३ भागांपैकी ५,६८३ भागांमध्ये संघ कार्य आहे. ३२,६८७ मंडळांमध्ये काम आहे, ९१० जिल्ह्यांपैकी ९०० जिल्ह्यांत काम आहे, ५६० जिल्ह्यांत जिल्हा केंद्रांवर ५ शाखा, ८४ जिल्ह्यांत सर्व मंडळांमध्ये शाखा आहेत. आम्ही विचार केला आहे की, आगामी तीन वर्षांत संघ कार्य सर्व मंडळांपर्यंत पोहोचायला हवे. पूर्णवेळ कार्यकर्त्यांबाबतीतही योजना तयार करण्यात आली आहे. २०२२ ते २०२५ पर्यंत कमीत कमी दोन वर्षे वेळ देणारे कार्यकर्ते तयार करणार आहोत, याची संख्या मार्च महिन्यात येईल. कोरोनामुळे दैनंदिन शाखा घेण्यात अडचणी येत होत्या, तरीही संपर्काच्या आधारावर देशात १,०५,९३८ ठिकाणी गुरुपूजनाचा कार्यक्रम करणे शक्य झाले.
प्रमुख मुद्दे
ऋ अमृत महोत्सवात अनाम क्रांतिकारकांचे जीवन समाजासमोर आणणार
ऋ देशभरात ५५ हजार ठिकाणी संघाचे प्रत्यक्ष कार्य, ५४,३८२ दैनिक शाखा
ऋ पुढील तीन वर्षांत मंडळस्तरावर संघकार्य पोहोचविण्याचे उद्दिष्ट