किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलकेंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय,
नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर – प्लास्टिक बॅगऐवजी १०० टक्के अन्नधान्य यापुढे ज्युटच्या (ताग) पोत्यातून विक्रीसाठी आणण्याचा तसेच साखरेपासून तयार होणार्या इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित पत्रपरिषदेत दिली. तागउत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी यापुढे सर्व अन्नधान्य तागाच्या पोत्यात भरून विक्रीसाठी आणण्याचा निर्णय आज घेण्यात आला. दुसरे म्हणजे, एकूण साखरेच्या २० टक्के साखरही तागाच्या पोत्यातून विकावी लागणार आहे. तागाच्या शेतीला प्रोत्साहन मिळावे, रोजगार वाढावा, तसेच शेतकर्यांचा आर्थिक फायदा व्हावा, म्हणून हा निर्णय ़घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितले. बंगाल व आसाममध्ये फार मोठ्या प्रमाणात तागाची शेती केली जाते. परंतु, पॉलिथिनच्या थैल्या आल्यानंतर ही शेती उद्ध्वस्त झाली होती.
तागाची उत्पादकता तसेच गुणवत्ता वाढवण्याबाबतचा एक कृती कार्यक्रमही सरकारने तयार केला आहे, यासाठी ताग उत्पादक शेतकर्यांना तागाचे प्रमाणित बी उपलब्ध करून दिले आहे, यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात हेक्टरी दहा हजार रुपयांची वाढ होणार आहे, याकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की, देशातील ताग उत्पादक शेतकर्यांचे हित जपण्यासाठी बांगला देशातून येणार्या तागावरील आयात करात वाढ करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यात ४ लाख शेतकरी ताग उत्पादक आहेत.
इथेनॉलच्या किंमतीत वाढ
उस उत्पादक शेतकर्यांना तसेच साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलच्या किंमतीत प्रती लिटर २ रुपयांपासून ३ रुपये ३५ पैशापर्यंत वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला, असे स्पष्ट करत जावडेकर म्हणाले की, यामुळे पहिल्या प्रकारच्या इथेनॉलची किंमत प्रती लिटर ६२.६५ रुपये होणार आहे. इथेनॉल बी हेवीची किंमत ५७.६१ रुपये तर इथेनॉल सी हेवीची किंमत ४५.६९ रुपये होणार आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील इथेनॉलच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशात इथेनॉलचे ३८ कोटी लिटर उत्पादन झाले होते. २०१९ मध्ये १९५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. म्हणजे इथेनॉलच्या उत्पादनात पाच पटीने वाढ झाली, याकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की, पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी सरकारने दिली आहे. या सर्व निर्णयांचा फायदा अंततोगत्वा शेतकर्यांनाच मिळणार आहे.
धरणदुरुस्ती
धरणांचे पुनवर्सन आणि दुरुस्ती योजनेच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्याला आज मंजुरी देण्यात आल्याचे जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले. एप्रिल २०२१ ते मार्च २०३१ अशा दहा वर्षांत आणि दोन टप्प्यात राबवण्यात येणार्या या योजनेवर १०२११ कोटी रुपये खर्च होणार आहे, असे शेखावत यांनी सांगितले.
या योजनेवर खर्च होणार्या निधीतील ८० टक्के निधी जागतिक बँक आणि एआयआयबीतून येणार आहे, दुसर्या टप्प्यात या योजनेतील धरणांची संख्या वाढवण्यात येणार आहे, देशातील १९ राज्ये या योजनेत सहभागी होणार असल्याचे शेखावत यांनी स्पष्ट केले.
एक लाख टन कांद्याचा राखीव साठा खुला करणार
इंदूर – कांद्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक लाख टन कांद्याचा राखीव साठा खुला करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी गुरुवारी दिली.
हा कांदा नाफेडच्या माध्यमातून बाजारात आणला जाणार आहे, कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी देशातून होणार्या निर्यातीवर आम्ही वेळीच बंदी घातली असून, आयातीचे मार्गही खुले केले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कांद्याच्या बीजनिर्यातीवर बंदी
कांद्याच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी कांद्याच्या बीज निर्यातीवर तत्काळ प्रभावाने बंदी घातली. यापूर्वी निर्यातदाराला कांदा बीजांची खेप विदेशात पाठवण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक होती.
मात्र, या निर्यातीबाबत झालेल्या सौद्यांसाठी ही बंदी लागू राहणार नाही, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) स्पष्ट केले आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत ५.७० लाख डॉलर्स मूल्याच्या कांदा बीजाची निर्यात करण्यात आली. मागील वर्षी एकूण ३५ लाख डॉलर्सची ही निर्यात होती.
दर नियंत्रणात ठेवण्यासाठी डीजीएफटीने कांद्याच्या निर्यातीवर अगोदरच बंदी घातली आहे. बाजारपेठेत कांदा उपलब्ध व्हावा तसेच नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने देशातील घाऊक आणि किरकोळ व्यापार्यांच्या साठ्यावर ३१ डिसेंबरपर्यंत मर्यादा आणली आहे. किरकोळ व्यापारी २ टन, तर घाऊक व्यापारी २५ टन कांद्याचा साठा ठेवू शकतील, असे ग्राहक विभागाच्या सचिव लीना नंदन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.