किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.09° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलअजित डोवाल यांनी व्यक्त केली चिंता,
पुणे, २८ ऑक्टोबर – कालमानानुसार आता युद्धांचे स्वरूप बदलले असून, युद्धक्षेत्रे आता सीमांवरून थेट नागरी वसाहतीत आली आहेत. यातून मग लोकांचे आरोग्य, त्यांचे कल्याण आणि सुरक्षिततेची भावना आणि सरकारबद्दलची त्यांची धारणा यासारख्या घटकांचा देशाच्या एकूणच व्यवस्थेवर परिणाम होतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज गुरुवारी केले.
‘आपत्ती आणि महामारीच्या युगात राष्ट्रीय सुरक्षा सज्जता’ या विषयावरील येथे आयोजित राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. याचे आयोजन पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राने केले आहे. डोवाल म्हणाले की, कोणतीही आपत्ती असो किंवा साथीच्या रोगाचा प्रादूर्भाव असो या संकटांचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची, सहकार्याची गरज असते. जगातील एकूणच सुरक्षेचे चित्रच आज पालटलेले आहे. राजकीय आणि लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आजकाल युद्धांचा वापर केला जातो.
युद्धक्षेत्रे आता केवळ सीमांवर किंवा तेथील युद्धभूमींवर राहिलेली नाहीत, तर ती नागरी वसाहतीत शिरली आहेत. त्यामुळे सामान्यांच्या विचारांचा, त्यांच्या धारणांचा, आरोग्याचा, कल्याणाचा विचार याला नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. या सर्वांचा परिणाम सहाजिकच देशाच्या मनोबलावर होत असतो. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि समाजमाध्यमांचा पगडा असलेल्या युगात लोकांना चुकीच्या आणि प्रक्षोभक प्रचारापासून वाचविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा आराखडा तयार करताना या सर्व घटकांचा आणि त्यासंदर्भात मिळणार्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचाही विचार करावा लागतो, असे डोवाल म्हणाले.
कोरोना, भूकंप, पूर मानसिकतेवर आघात
संपूर्ण जगाने मागील काही काळापासून कोरोनासारख्या आपत्तीचा सामना केला आहे. कोरोनासारखी महामारी आणि भूकंप, पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती लोकांच्या मानसिकतेवर सखोल परिणाम करतात. कारण, अशा घटनांनी त्यांना आर्थिक नुकसानासोबतच आपण जगू की नाही, अशी भीतीही वाटू लागते. यातून सामाजिक असमतोल निर्माण होतो. त्याचा परिणाम राजकीय स्थैर्यावर, आर्थिक विकासावर आणि देशाच्या आव्हानांशी सामना करणार्या एकूणच कार्यक्षमतेवर होतो. अशा स्थितीतून लोकांना सावरण्यासाठी सर्वप्रथम उपचार, नंतर दक्षतेचे उपाय आणि पुनर्वसन यातून मार्ग काढावा लागतो. सरकारनेही या स्तरावर मागील काही काळापासून बराच संघर्ष केला आहे, असे डोवाल यांनी सांगितले.