किमान तापमान : 29.42° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.41 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.28°से. - 31.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशधनुष, मनोज बाजपेयी, कंगना राणावत उत्कृष्ट अभिनयासाठी सन्मानित,
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर – ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात आज सोमवारी दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांना प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विज्ञान भवनात झालेल्या समारंभात उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी रजनीकांत यांना त्यांच्या पाच दशकातील चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी या पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी रजनीकांत यांच्या पत्नी लता, मुलगी सौंदर्या तसेच जावई धनुष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, याच समारंभात असुरन चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने धनुष यांनाही गौरविण्यात आले. एकाचवेळी सासरे आणि जावयाला त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्याचा हा आगळावेगळा समारंभ ठरला.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यामुळे मी अतिशय आनंदी आहे, या पुरस्कारासाठी मी केंद्र सरकारचा आभारी आहे, असे सत्काराला उत्तर देताना रजनीकांत म्हणाले. हा पुरस्कार मी माझे गुरू बालाचंदर यांना समर्पित करतो. मला पितातुल्य असलेले सत्यनारायण गायकवाड, ज्यांनी मला उच्चतम मूल्य आणि अध्यात्माची शिकवण दिली, त्याचाही मी आभारी आहे, असे ते म्हणाले.
मनकर्णिका तसेच पंगा या दोन चित्रपटातील भूमिकांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांना उत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार धनुष यांना असुरन चित्रपटातील भूमिकेसाठी तर मनोज बाजपेयी यांना भोसले चित्रपटातील भूमिकेसाठी विभागून देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार साजिद नडियादवाला यांच्या छिछोरे चित्रपटाला देण्यात आला. हा पुरस्कार नडियादवाला यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांना समर्पित केला. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.