किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचे लोकार्पण,
वाराणसी, २५ ऑक्टोबर – आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेमुळे केवळ उत्तरप्रदेशातील पायाभूत आरोग्यसेवा मजबूत होणार नाहीत, तर या माध्यमातून भविष्यातील महामारींसाठी देश सज्ज झाला आहे आणि आरोग्य क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याचा विश्वास या योजनेतून मिळाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वाराणसीत आज ६४ हजार कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचे लोकार्पण करण्यात आले.
या व्यतिरिक्त वाराणसी लोकसभा मतदारसंघातील ५,२०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य हा कर्माचा आधार मानला जातो आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी केली जाणारी गुंतवणूक ही नेहमीच सर्वोत्तम समजली जाते. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या आघाडीवर फारसे काम झालेले नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले.
दीर्घकाळापासून ज्यांचे सरकार होते, त्यांनी चौफेर विकासापासून आरोग्य क्षेत्राला वंचित ठेवले. एक तर गावांमध्ये पुरेशा प्रमाणात रुग्णालये नव्हती किंवा डॉक्टर उपलब्ध नव्हते. खंड पातळीवर चाचणीच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. लोकार्पण केलेल्या नवीन आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेच्या माध्यमातून या समस्यांवर लवकरच तोडगा काढला जाणार आहे. पुढील चार वर्षांत गावांपासून ते खंडांपर्यंत आणि राष्ट्रीय पातळीवर आरोग्याचे मजबूत जाळे या योजनेतून विणले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेच्या माध्यमातून संपूर्ण परिसंस्था विकसित केली जाणार आहे. यातून देशाच्या प्रत्येक कोपर्यात उपचारांपासून ते कठीण संशोधनाची कार्ये पार पाडली जातील. हे सर्व दशकांपूर्वी व्हायला पाहिजे होते. मात्र, परिस्थिती काय होती, हे मला सांगण्याची गरज नाही, असे मोदी यांनी सांगितले.
नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे आभासी पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. उत्तरप्रदेशात यापूर्वी सत्तेत असलेल्यांनी पूर्वांचलमधील नागरिकांच्या पायाभूत वैद्यकीय गरजांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कुटुंबीयांच्या तिजोर्या भरल्या, अशी विरोधकांवर सडकून टीका केली. भाजपाच्या सत्ताकाळात आता हा परिसर वैद्यकीय केंद्र म्हणून ओळखला जात असल्याचे सांगितले.
मिशनचे तीन प्रमुख पैलू
रोगाचा शोध आणि उपचारांसाठी विस्तृत सुविधांची निर्मिती करणे. या अंतर्गत गाव आणि शहरांमध्ये आरोग्य आणि कल्याण केंद्रे उभारली जातील. यात लवकर रोगनिदान करण्याची सुविधा असेल.
रोगनिदानासाठी चाचणी केंद्रांचे जाळे निर्माण करणे.
देशातील प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण करणे. महामारीच्या काळात तिसर्या पातळीवरील जैवसुरक्षित प्रयोगशाळांची गरज असते. सध्या देशात अशा १५ प्रयोगशाळा कार्यरत.