किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, २४ ऑक्टोबर – चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना उद्या सोमवारी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या मोठ्या योगदानासाठी त्यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
रजनीकांत यांना दादासाहेब पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एप्रिल महिन्यात केली होती. चाहत्यांद्वारे थलैवा नावाने संबोधल्या जाणारे रजनीकांत यांना २५ ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय चित्रपट महोत्सव महासंचालनालयाने अधिकृत ट्विटर हॅण्डलवर दिली. २०१९ साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मागील वर्षी घोषित करण्यात आला. मात्र, कोरोना महामारीमुळे वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला.
चित्रपटसृष्टीत मोठे योगदान देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार आहे. २०१८ मध्ये हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला होता.
के. बालचंदर नसल्याची खंत ः रजनीकांत
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळेल, अशी कधीच अपेक्षा केली नव्हती. हा पुरस्कार प्राप्त करताना माझे गुरू के. बालचंदर हयात नसल्याचे दुःख आहे, अशी प्रतिक्रिया रजनीकांत यांनी व्यक्त केली.