किमान तापमान : 26.05° से.
कमाल तापमान : 26.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 52 %
वायू वेग : 2.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.05° से.
25.99°से. - 28.66°से.
बुधवार, 19 फेब्रुवारी25.62°से. - 28.89°से.
गुरुवार, 20 फेब्रुवारी26.23°से. - 30.31°से.
शुक्रवार, 21 फेब्रुवारी26.47°से. - 29.59°से.
शनिवार, 22 फेब्रुवारी26.55°से. - 29.52°से.
रविवार, 23 फेब्रुवारी26.48°से. - 29.5°से.
सोमवार, 24 फेब्रुवारीकोची, २४ ऑक्टोबर – पहिल्या चाचणीनंतर स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका दुसर्या चाचणीसाठी आज रविवारी येथून रवाना झाली आहे.
विमानवाहू विक्रांतची पहिली सागरी चाचणी ऑगस्टमध्ये झाली होती. या पहिल्या चाचणीदरम्यान विक्रांतच्या सांगाड्याच्या टिकाऊ क्षमतेची, मुख्य प्रणोदन यंत्रणेची, ऊर्जा निर्मिती आणि वितरण आणि इतर उपकरणांची चाचणी घेण्यात आली होती. सदर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाइस ऍडमिरल ए. के. चावला यांनी या चाचणीचा आढावा घेतला होता.
विमानवाहू विक्रांत युद्धनौकेतील ७६ टक्के उपकरणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहेत. ही नौका आत्मनिर्भर भारताचे आणि मेक इन इंडियासाठी नौदल करीत असलेल्या प्रयत्नांचे उदाहरण आहे, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महिला अधिकार्यांसाठी वेगळी व्यवस्था
हे विमानवाहू जहाज २६२ मीटर लांब, ६२ मीटर रुंद आणि ५९ मीटर उंच आहे. जहाजावरील १७०० नौदल कर्मचार्यांसाठी २३०० कंपार्टमेट तयार करण्यात आले आहेत. यात महिला अधिकार्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.