किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 2.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
26.84°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलनेत्यांची पातळी खालावली, आश्वासन एकसमान असल्याचा दावा,
नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर – जगभरात डॉक्टरांवर सर्वाधिक विश्वास ठेवण्यात येत असून, प्रत्येकी दुसरा व्यक्ती त्यांच्यावर विश्वास ठेवत असतो. दुसरीकडे, सर्वांत कमी विश्वास असलेल्या लोकांमध्ये नेते, मंत्री, वकील यांचा समावेश असल्याची माहिती इप्सोस कंपनीने केलेल्या ग्लोबल ट्रस्टवर्दिंग इंडेक्स-२०२१ मध्ये देण्यात आली आहे. हा निर्देशांक नऊ वर्गवारीच्या आधारे तयार केला आहे.
फ्रान्समधील इप्सोस नावाच्या कंपनीने २८ देशांत विश्वासू व्यावसायिकासंदर्भात पाहणी केली होती. भारत, अमेरिका, कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया आदी देशांचा त्यात समावेश आहे. मागील दीड वर्षांपासून सर्वांना अनुभवास येत असलेल्या कोरोनाकाळात जगभरातील डॉक्टरांबद्दलच्या विश्वासात वाढ झाली आहे. भारतीय नागरिक सैन्य, संशोधक, शिक्षकांवर सर्वाधिक विश्वास ठेवतात. दुसरीकडे राजकीय नेते, सरकारमधील मंत्री, सरकारी कर्मचारी, बँकेतील कर्मचारी, पत्रकार, न्यायाधीश, वकिलांवर सर्वांत कमी विश्वास ठेवत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, जगभरातील नेते एकसमान भासत असतात. आश्वासन तर देतात पण त्याचे पालन करण्यात अनेक वर्षे निघून जातात. जनतेच्या हाती काहीच येत नाही, असेही या सर्वेक्षणात नमूद केले आहे.
वृत्तनिवेदकांवरही नाराजी
भारतीयांनी वृत्तवाहिन्यांवरील बातमी देणार्या वृत्तनिवेदकांवरही नाराजी व्यक्त केली आहे. ही मंडळी बातम्यांऐवजी अन्य चर्चेत जास्त व्यस्त दिसून येतात. त्यांच्या बातम्यांवर विश्वास ठेवणे कठीण असल्याचेही इप्सोसच्या अहवालात नमूद आहे.