किमान तापमान : 26.62° से.
कमाल तापमान : 26.87° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.87° से.
26.45°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल१५ हजार जागा वाढल्या,
नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर – मागील सात वर्षांच्या काळात देशभरात १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. यावर सुमारे १७ हजार ६९१ कोटींहून अधिक रक्कम खर्च केली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या नवीन महाविद्यालयांमुळे जवळपास १५ हजार जागा वाढल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या एका निवेदनानुसार, केंद्र सरकार पुरस्कृत योजनेच्या (सीएसएस) माध्यमातून सुमारे २,४५४.१ कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध करून दिली आहे. ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकार संचालित वैद्यकीय महाविद्यालयांत अधिक सुविधा निर्मितीसाठी देण्यात आली. देशभरातील आरोग्य संस्थांचा आलेख वाढविण्यासाठी हा निधी दिला नसून, सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा तत्काळ उपलब्ध व्हावा, हा यामागचा उद्देश असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
याशिवाय शासकीय वा खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या जिल्ह्यांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. अमागास/अराखीव असलेल्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. सीएसएस योजनेंतर्गत तीन टप्प्यात १५७ नवे वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. याशिवाय १५७ पैकी विशेष अशा ३९ जिल्ह्यांमध्ये ३९ महाविद्यालये निर्माण करण्यात आलेली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
एमबीबीएसच्या दहा हजार जागांचा समावेश
दरम्यान, वाढण्यात आलेल्या जागांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या सुमारे १० हजार जागांचा समावेश आहे. या संपूर्ण योजनेवर केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने अनुक्रमे ९०:१० अशा प्रमाणात भागीदारी असून, विशेष श्रेणीच्या राज्यांना ६०:४० असे प्रमाण विभागून दिले आहे. एकूण १५७ नव्या महाविद्यालयांपैकी ४८ महाविद्यालयांमध्ये (१५ राज्य) ३,३२५ जागांचा समावेश आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे ६७१९.११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.