किमान तापमान : 26.94° से.
कमाल तापमान : 26.97° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.97° से.
26.87°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.85°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलसुरक्षेवरील बैठकीत शाह यांचा स्पष्ट आदेश,
श्रीनगर, २३ ऑक्टोबर – जम्मू-काश्मिरातील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी शेवटचा प्रहार करा, असा स्पष्ट आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी येथे सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राजभवन येथे झालेल्या बैठकीत सुरक्षा दलांना दिला. या बैठकीसाठी लष्कराचे, सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफ आणि गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आज दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी साडेचार वाजता संपली. अलिकडेच झालेले दहशतवादी हल्ले आणि खोर्यातील सुरक्षा व्यवस्थेवर शाह यांनी या बैठकीत अधिकार्यांसोबत तपशीलवार चर्चा केली. सर्वांनीच एकत्रित काम करून दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी शेवटचा प्रहार करा, असा आदेश त्यांनी सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिला.
जम्मू-काश्मिरात अलिकडे दहशतवादी कारवाया वाढल्या असून, गैर-काश्मिरींची हत्या केली जात आहे. या पृष्ठभूमीवर अमित शाह यांची सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकार्यांसोबत झालेली बैठक अतिशय महत्त्वपूर्ण समजली जात आहे.
परिसीमनानंतर होणार निवडणूक, राज्याचा दर्जाही
संसदेत दिलेले आश्वासन कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल. परिसीमनानंतर जम्मू-काश्मिरात निवडणूक घेतली जाईल आणि राज्याचा अधिकारही दिला जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटीबद्ध असून, येथील विकासासाठी सरकार शक्य तितके निर्णय घेत आहे आणि भविष्यातही घेतले जातील. पाकिस्तानला मी प्रत्युत्तर देऊ शकतो. पण, मी तुमच्यासोबच संवाद साधायला आलो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तुम्ही मोठी स्वप्ने पाहा. तुमचे स्वप्न केंद्र सरकार पूर्ण करेल. मी कुण्या आमदार किंवा मुख्यमंत्र्याचा मुलगा नाही. भाजपात असलेल्या लोकशाहीमुळे मी तुमच्यासमोर उभा आहे. याच लोकशाहीच्या बळावर तुम्ही सरपंच आणि मुख्यमंत्रीही होऊ शकता, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी येथे शांतता आवश्यक आहे. लष्कर येथील दहशतवाद संपुष्टात आणेल. मोदी सरकारने तुमच्यासाठी कित्येक योजना तयार केल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन अमित शाह यांनी युवकांना केले.
शांततेत अडथळे आणणार्यांना सोडणार नाही
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर प्रथमच तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौर्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी दौर्याच्या पहिल्याच दिवशी दहशतवादावर कडाडून हल्ला चढवला. जम्मू-काश्मिरातील शांततेत अडथळे आणणार्यांना सोडणार नाही. त्यांचा कठोरपणे बिमोड केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी येथे युवकांना संबोधित करताना दिली.
जम्मू-काश्मिरात सुरू झालेल्या विकासात कुणीही अडथळा निर्माण करू शकणार नाही. यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने ७० वर्षांत काय दिल, या कालावधीत विरोधकांनी ८७ आमदार, ६ खासदार आणि तीन कुटुंबे दिली आहेत, असे टीकास्त्र विरोधकांवर सोडले. पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० हजार लोकनियुक्त प्रतिनिधी दिले असून, ते नागरिकांची सेवा करीत असल्याचे शाह यांनी सांगितले.
जम्मू-काश्मिरातील युवक आता विकास, रोजगार आणि अभ्यासाबाबत चर्चा करीत आहेत. हा एक मोठा बदल जम्मू-काश्मिरात घडला आहे. जम्मू-काश्मिरातील शांततेत अडथळे निर्माण करणार्यांचा कठोरपणे बिमोड केला जाईल. कुणी कितीही शक्ती पणाला लावली, तरी काश्मीरमध्ये सुरू असलेला हा सकारात्मक बदल रोखू शकणार नाही, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित युवकांना दिली.
विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी
जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. केंद्र सरकार भविष्यातही निधी देत राहील. केंद्र सरकारने इतर राज्यांच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमध्ये निधी दिला आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास येथील रोजगाराच्या संधी वाढतील. सफरचंद आणि केशराच्या बागांनाही प्रोत्साहन मिळेल, असे अमित शाह यांनी सांगितले. पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत. त्यामुळे येथे पर्यटन वाढले असल्याचे शाह यांनी सांगितले.
भाषणातील प्रमुख मुद्दे
युवकांची स्वप्ने आम्ही पूर्ण करू
देशाच्या शत्रूंचा खात्मा करणार
सुरक्षा दलांनी संयुक्त लढा द्यावा
विकासासाठी सर्वतोपरी मदत
अभ्यास, रोजगार केंद्रस्थानी
पर्यटनावर दिला जोर