किमान तापमान : 26.65° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.8°से. - 31.14°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलअमित शाह यांनी घेतला काश्मिरातील स्थितीचा आढावा, कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर पहिलाच दौरा,
श्रीनगर, २३ ऑक्टोबर – उच्चस्तरीय बैठकीनंतर शाह यांनी अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत हुतात्मा झालेले सीआरपीएफचे अधिकारी परवेज अहमद यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परवेज यांच्या पत्नी फातिमा यांना जम्मू-काश्मीर प्रशासनात शासकीय नोकरीचे नियुक्ती पत्र सोपविले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी काश्मीरला भेट दिली आणि गैरकाश्मिरी नागरिकांच्या हत्यासत्राच्या पृष्ठभूमीवर तेथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रथमच या केंद्रशासित प्रदेशाला भेट दिली आहे. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा आहे.
आज सकाळी येथे दाखल झाल्यानंतर राजभवनात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह लष्कर, सीआरपीएफ, पोलिस दल आणि इतर सुरक्षा संस्थांमधील अधिकारी उपस्थित होते. काश्मीर खोर्यात दहशतवाद्यांच्याविरोधात उचण्यात आलेल्या पावलांची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. या महिन्यात आतापर्यंत खोर्यात अतिरेक्यांनी ११ गैरकाश्मिरी नागरिकांची हत्या केली आहे. या अनुषंगाने शाह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.