किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.22° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 42 %
वायू वेग : 3.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
26.53°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलभाजपाने आकडेवारीसह लगेच दिले प्रत्युत्तर,
नवी दिल्ली, २१ डिसेंबर – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर देत, राजीव गांधी हेच झुंडबळीचे जनक होते असे म्हटले आहे.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या शीख नरसंहाराचे कॉंग्रेसने समर्थन केले होते, अशी टीका भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी केली. जेव्हा मोठा वृक्ष कोसळतो, त्यावेळी जमीन हादरतेच, हा राजीव गांधी यांनी त्या काळात केलेल्या भाषणातील संदर्भ त्यांनी दिला. यावेळी मालविय यांनी कॉंग्रेसच्या सत्ताकाळात १९६९ ते १९९३ या कालावधीत झालेल्या दंगलींची माहिती दिली. अहमदाबाद (१९६९), जळगाव (१९७०), मुरादाबाद (१९८०), नेल्ली (१९८३), भिवंडी (१९८४), दिल्ली (१९८४), अहमदाबाद (१९८५), भागलपूर (१९८९), हैदराबाद (१९९०), कानपूर (१९९२), मुंबई (१९९३) अशी दंगलींची यादी त्यांनी दिली.
नेहरू-गांधी परिवाराची सत्ता असताना शंभराहून जास्त जणांचा बळी घेणार्या दंगलींची लहान यादी असल्याचे त्यांनी सांगितले.
झुंडबळी शब्द २०१४ पूर्वी ऐकला नव्हता
भाजपा सत्तेत येण्याच्या म्हणजेच २०१४ पूर्वी झुंडबळी हा शब्द ऐकला नव्हता, अशी टीका ट्विट करीत भाजपावर करताना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी धन्यवाद मोदीजी, असा टोला लावला.
या झुंडबळीच्या टीकेबाबत झालेल्या पत्रपरिषदेत प्रश्न विचारला असता, सरकारची दलाली करू नका, असे त्यांनी पत्रकारांना सुनावले. भाजपाने दिलेल्या प्रत्युत्तरावर विचारलेल्या प्रश्नावरून त्यांचा तोल सुटला. २०१४ पूर्वी झुंडबळी हा शब्द ऐकला नव्हता, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कॉंग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमधील अमृतसर आणि कपुरथळा येथे झालेल्या झुंडबळीच्या पृष्ठभूमीवर त्यांनी ही टीका केली आहे.