किमान तापमान : 26.65° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.71°से. - 31.14°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलभाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत नड्डा यांचे आवाहन,
नवी दिल्ली, २१ डिसेंबर – भाजपा संसदीय पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत विधि आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक सुधारणा विधेयकाची सविस्तर माहिती सादर करीत, या विधेयकाची आवश्यकता विशद केली. २५ डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिवस देशभर सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी खासदारांना केले.
भाजपा संसदीय पक्षाची बैठक आज सकाळी डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते; मात्र गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा उपस्थित होते. बैठकीत झालेल्या कामकाजाची माहिती नंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पत्रकारांना दिली.
निवडणूक सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत तर मंगळवारी राज्यसभेत पारित करण्यात आले. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. त्यामुळे हे विधेयक आणण्यामागची पार्श्वभूमी बैठकीत स्पष्ट करण्यात आली.
या बैठकीला नड्डा यांनीही संबोधित केले. २५ डिसेंबर हा अटलबिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिवस देशभर सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन नड्डा यांनी केले. खासदारांनी आपापल्या मतदारसंघात क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्या. कुपोषणाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे स्वस्थ बाल-बालिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, याचा उल्लेख करत खासदारांनीही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे नड्डा यांनी म्हटले.
कुपोषित बालकांना अंगणवाडी केंद्रांशी जोडा
देशात कुपोषित बालकांची संख्या १३ कोटी ७८ लाख आहे, यातील ७ कोटी ५१ लाख बालके अंगणवाडी केंद्राशी जुळले आहेत, तर ६ कोटी २७ लाख बालके अंगणवाडी केंद्राशी जुळले नाही. काही कारणांनी अंगणवाडी केंद्राशी जुळल्या न गेलेल्या बालकांना खासदारांनी प्रयत्नपूर्वक केंद्राशी जोडले पाहिजे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यत हे काम पूर्ण झाले पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्या मतदारसंघातील सर्व पातळीवरच्या भाजपा पदाधिकार्यांची तसेच कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करीत खासदारांनी पक्षाची कार्यक्रमाची माहिती त्यांच्यापर्यत पोहोचवावी, असे आवाहन नड्डा यांनी केले.