किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 26.62° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 69 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
25.99°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलपनामा पेपर्स प्रकरणात सहा तास प्रश्नांची सरबत्ती,
नवी दिल्ली, २० डिसेंबर – पनामा पेपर्स प्रकरणी समन्स बजावल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने आज सोमवारी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची येथील कार्यालयात सहा तास चौकशी केली. या प्रकरणी ईडीने तिचा पती अभिषेक बच्चनलादेखील समन्स बजावला आहे. ऐश्वर्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे अथवा नाही, याची माहिती समोर आलेली नाही.
विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत ईडीने तिचे बयाण नोंदवून घेतले. जामनगर येथील ईडीच्या कार्यालयातून ऐश्वर्या राय बच्चन सायंकाळी सात वाजता बाहेर पडली. या प्रकरणी तिने काही दस्तावेज ईडीला सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्याला यापूर्वी समन्स बजावण्यात आला होता. मात्र, चौकशीसाठी तिने दोन वेळा मुदत मागितली होती. २०१७ मध्ये झालेल्या विदेशी चलन कायद्याच्या उल्लंघनाबाबत ईडीने तपास सुरू केला आहे.
ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथे २००४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ऍमिक पार्टनर्स कंपनीत ऐश्वर्या राय बच्चन संचालक होती. विधी कंपनी मोझॅक फोन्सेकाने या कंपनीची नोंदणी केली होती व यात ५० हजार डॉलर्सचे भांडवल दाखवण्यात आले होते. २००९ मध्ये ऐश्वर्या या कंपनीतून बाहेर पडली. दुबईतील बीआरके ऍडोनीसने या कंपनीचे अधिग्रहण केले होते.
जया बच्चन यांनी दिला शाप
ऐश्वर्या राय बच्चनची ईडीने चौकशी केली असताना दुसरीकडे, ऐश्वर्याची सासू म्हणजे समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन राज्यसभेत आक्रमक झाल्या. जया बच्चन बोलत असताना सत्ताधारी बाकावरील भाजपाच्या काही खासदारांनी आक्षेप घेतला. यावरून जया बच्चन आणि भाजपा खासदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तुमचे वाईट दिवस लवकरच सुरू होतील, असा शाप जया बच्चन यांनी सत्ताधार्यांना दिला.
विचारण्यात आलेले प्रश्न
ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स येथे स्थापन करण्यात आलेल्या ऍमिक पार्टनर्स कंपनीशी तुमचा कोणता संबंध आहे? या कंपनीची नोंदणी करणारी विधी कंपनी मोझॅक फोन्सेकाची तुम्हाला माहिती आहे का? या कंपनीच्या संचालकांमध्ये तुम्ही, तुमचे वडील कोटेदिरामन् राय कृष्ण राय, तुमची आई कविता राय आणि तुमचा भाऊ आदित्य राय यांचा समावेश होता, संचालक पदावरून तुम्ही समभागधारक का झाल्या? २००८ मध्ये ही कंपनी निष्क्रिय का झाली?