किमान तापमान : 26.62° से.
कमाल तापमान : 26.87° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.87° से.
26.45°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलआयएसआयची अतिरेकी संघटनांसोबत बैठक,
श्रीनगर, २० डिसेंबर –
भारताची चिंता वाढवणारी माहिती समोर आली असून, हिवाळा आणि बर्फवृष्टीच्या काळातही सीमेपलीकडून अतिरेक्यांचे कारस्थान सुरूच आहे. पाकिस्तानने आता व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकी संघटनांमध्ये तरुणांची भरती सुरू केली आहे.
यासाठी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि अतिरेकी संघटनांत बैठकी सुरू आहेत. या बैठकांमध्ये अतिरेकी संघटनांमध्ये तरुणांची भरती करण्याची योजना आखण्यात आल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी सादर केला आहे. संघटनांमध्ये अधिकाधिक नवीन भरती आणि त्यांच्या प्रशिक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या अहवालातून समोर आली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सय्यद सलाहुद्दीन आणि आयएसआयच्या अधिकार्यांमध्ये बैठक झाली. यात काश्मीर आणि व्याप्त काश्मीरमधील संघटनांमध्ये तरुणांना सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हिजबुलच्या वाहिद उल्लाह नावाच्या कमांडरला भरतीची जबाबदारी देण्यात आली. काश्मीरच्या शुरा दलाचा प्रमुख तय्यब फारुकीदेखील मोठ्या संख्येने भरती करण्यासाठी व्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नियंत्रण रेषेजवळ अतिरेक्यांकडून पाहणी
अतिरेकी संघटना पठाणकोट परिसरात सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची योजना आखत आहेत. यासोबतच नियंत्रण रेषेपलीकडे अतिरेक्यांना पकडण्यासाठी पाकिस्तानी लष्कर तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक संरक्षण आघाडी परिसरात पाकिस्तानी लष्कराच्या ८ ते १० कमांड्स तैनात करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी आघाडीची ही ठिकाणे माछिल, केरन, तंगधर आणि नौगाम सेक्टरमध्ये आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील एसएसजी कमांडोसह तेजियान, धुंडियाल, जुरा आणि लिपा आघाडीवरील अतिरेकी नियंत्रण रेषेवर पाहणी करीत असल्याचा दावा सूत्रांनी केला.