किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– २२ जानेवारी हा विजय दिवस : अमित शाह,
नवी दिल्ली, (१० फेब्रुवारी) – रामाशिवाय भारताची कल्पनाही करता येत नाही, राम या देशाचा आत्मा आहे, भारताची संस्कृती आणि रामायण वेगळी करता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले. २२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिरात झालेल्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्यावर लोकसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चेत शाह बोलत होते. २२ जानेवारी हा दिवस ५०० वर्षांच्या संघर्षावरील विजयाचा दिवस आहे. हा दिवस येत्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात नोंदलेला असेल. याच दिवसाासून महान भारताच्या यात्रेची सुरुवात झाली आहे. हा दिवस आपल्या मातृभूमीची विश्वगुरूच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल प्रशस्त करणारा आहे. या देशाची कल्पना राम आणि रामचरितमानसशिवाय करता येत नाही, राम आणि रामाचे चरित्र या देशातील कोट्यवधी जनतेचा प्राण आहे, असे अमित शाह म्हणाले.
जेव्हा आम्ही राममंदिर, ३७० कलमचे आश्वासन देत होतो, तेव्हा आम्ही जी पूर्ण करतो, तीच आश्वासने देतो, असे म्हटले होते, याकडे लक्ष वेधत शाह म्हणाले की, तेव्हा तुम्ही आम्हाला विरोध करीत होता, पण हे मोदी सरकार आहे, जे बोलते ते करून दाखवते. मी माझ्या मनातील गोष्ट तसेच देशातील जनतेच्या भावना या सभागृहात मांडू इच्छितो. हा आवाज न्यायालयातील कागदांखाली दबला होता. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या दबलेल्या आवाजाला अभिव्यक्ती मिळाली. २२ जानेवारीचा दिवस १५२८ वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायाच्या लढाईचा शेवटचा दिवस होता.
बहुसंख्यक भावनांचा आदर करा
राममंदिराच्या आंदोलनाला विसरून आम्ही या देशाचा इतिहास शिकू शकत नाही. १५२८ पासून राममंदिर आंदोलन प्रत्येक पिढीने वेगवेगळ्या टप्प्यात पाहिले आहे. हा मुद्दा दीर्घकाळ लटकला, भटकला, पण मोदींच्या काळातच या स्वप्नाची पूर्तता झाली, ते साकार झाले. जे रामाशिवाय भारताची कल्पना करतात, ते या देशाला ओळखतच नाही. ते देशातील गुलामीच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात. आदर्श जीवन कसे जगावे, याचा राम हे आदर्श आहेत, त्यामुळेच ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, असे शाह यांनी सांगितले. भारतातील अल्पसंख्यकांनी बहुसंख्यकांच्या राममंदिराबाबतच्या भावनांचा आदर करीत ही वस्तुस्थिती मान्य करावी, सहकार्य करावे, हवनात हड्डी टाकू नये, असे आवाहन शाह यांनी केले.