किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास,
नवी दिल्ली, (१० फेब्रुवारी) – अनेक पिढ्या ज्या कामांची वाट पाहात होत्या, ती सर्व कामे या लोकसभेच्या कार्यकाळात झाली. कलम ३७० हटवून संविधानातील आत्म्याचे प्रगटीकरण करण्यात आले. त्यामुळे ज्यांनी देशाचे संविधान बनवले, त्यांचा आत्मा आम्हाला आशीर्वाद देत असेल. काश्मीरच्या लोकांना आतापर्यंत सामाजिक न्यायापासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यांच्यापर्यंत आम्ही सामाजिक न्याय पोहोचवला. दहशतवादरूपी राक्षसाने या देशाची जमीन रक्तबंबाळ झाली होती. आम्ही दहशतवादाविरुद्ध अनेक कठोर कायदे बनवले, त्यामुळे देश दहशतवाद मुक्त करण्याचे स्वप्न साकार होतांना दिसत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असतानाच्या उत्सवकाळात या सभागृहाने अनेक चांगल्या कामाचे नेतृत्व केले. १७ व्या लोकसभेची पहिली सात सत्र खूप जास्त उत्पादक राहिली. पहिल्या सत्रात तर आम्ही ३० विधेयके पारित केली, जो एक विक्रम होता. यासाठी सर्व सदस्यांचा, सभागृहातील गटनेत्यांचा मी आभारी आहे. लोकसभा निवडणुका आता फार दूर नाही, त्यामुळे काही जणांना अस्वस्थ वाटत असेल. मात्र, हा लोकशाहीतील सहज आणि आवश्यक भाग आहे. आमच्या देशातील निवडणूक आणि लोकशाही परंपरा हा जगासाठी अचंबित करणारा विषय आहे, असे मोदी यांनी सांगितले. नवीन संसदेची सुरुवात नारीशक्ती वंदन अधिनियमाने झाली. जेव्हाजेव्हा नवीन संसदेची चर्चा होईल, तेव्हा नारीशक्ती वंदन अधिनियमाचा उल्लेख करावाच लागेल. हे विधेयक पारित झाले तेव्हाच आम्हाला नवीन संसदेच्या पवित्रतेचा अनुभव आला, असे मोदी म्हणाले.
ओम बिर्ला यांची केली प्रशंसा
१७ व्या लोकसभेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. प्रत्येक कठीण परिस्थितीत मी त्यांना हसताना पाहिले, असे ते म्हणाले. मोदी यांचे भाषणासाठी सभागृहात आगमन होताच भाजपा सदस्यांनी जय श्रीरामच्या घोषणांत त्यांचे स्वागत केले. भाजपा सदस्यांच्या उत्साह यावेळी ओसंडून वाहात होता.
संसद उपहारगृहातील सवलतीचे दर नाकारले
आपल्या कृतीने देशातील लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी सर्व सदस्यांनी आपल्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय स्वेच्छेने कोरोना काळात घेतला होता. संसद सदस्यांना भरपूर वेतन आणि भत्ते मिळत असतानाही संसदेच्या उपहारगृहात ते सवलतीच्या दरात भोजन करतात, याबाबत त्यांच्यावर माध्यमातून सातत्याने टीकाच होत होती. त्यामुळे यापुढे संसदेच्या उपहारगृहात सर्वांसाठी समान दर असतील, असा निर्णय तुम्ही (लोकसभा सभापतींनी) घेतला, त्याचा मी आणि सर्वपक्षीय सदस्यांनी नम्रपणे स्वीकार केला, असे मोदी यांनी सांगितले.
राममंदिराबाबत सभागृहात पारित प्रस्ताव ऐतिहासिक
राममंदिराबाबत या सभागृहात जो प्रस्ताव पारित झाला, तो ऐतिहासिक असा आहे. त्यामुळे भावी पिढीला या देशातील मूल्यांवर अभिमान करायला संविधानिक शक्ती मिळणार आहे. अशा घटनांत सहभागी होण्याची शक्ती आणि सामर्थ्य सगळ्यांमध्ये नसते. सभागृहातील या विषयावरच्या चर्चेत जे मुद्दे मांडण्यात आले, त्यात संकल्प, सामर्थ्य आणि संवेदना आहे. सबका साथ आणि सबका विकास आहे. येणार्या पिढ्यांसाठी आम्ही काही ना काही चांगले करत राहू, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.