किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.98° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.76°से. - 27.41°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल25.27°से. - 27.79°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.16°से. - 28.5°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.9°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.58°से. - 28.05°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.41°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादलअयोध्या, (१८ जानेवारी) – २२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये सुट्टी जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने आता अर्धा दिवस सुट्टी देण्याचा आदेश दिला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारी रोजी सर्व केंद्र सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील, असे केंद्राने गुरुवारी जाहीर केले. कर्मचार्यांच्या भगवान रामप्रती असलेल्या भावना आणि त्यांची विनंती लक्षात घेऊन २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला की लोकांनी घरात बसून कार्यक्रम पाहावा, हा या सुट्टीचा उद्देश आहे. केंद्राच्या घोषणेपूर्वी अनेक राज्यांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये २२ जानेवारीला बंद ठेवण्याची घोषणा राज्यातील योगी सरकारने केली आहे. या दिवशी संपूर्ण राज्यात दारू आणि मांसाची दुकाने बंद राहणार आहेत.
मध्य प्रदेश: मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दिवशी राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यात दारू आणि मांसाची दुकाने बंद राहणार आहेत.
छत्तीसगड: भगवान श्री राम यांचे मातृ जन्मस्थान छत्तीसगडमध्ये २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी राज्यात दारूची दुकानेही बंद राहणार आहेत.
हरियाणा: २२ जानेवारीला हरियाणातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. या दिवशी राज्यात मद्यविक्रीवर बंदी आहे.
राजस्थान: या दिवशी सुट्टी नसली तरी राज्यात दारूची दुकाने बंद राहतील.
गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकारी कार्यालये आणि शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
२२ जानेवारी रोजी दुपारी १२.२० वाजता राम मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे. राम मंदिराचा अभिषेक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तर २२ जानेवारीपूर्वी १६ जानेवारीपासूनच विधी सुरू झाले आहेत. अभिषेक करण्याच्या तयारीसाठी दररोज विधी केले जात आहेत. अभिषेक विधीच्या दुसर्या दिवशी रामाची मूर्ती मंदिर परिसरात पोहोचली.
दरम्यान, बार कौन्सिल ऑफ इंडियानेही भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहून २२ जानेवारीला सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली आहे. चेअरमन मनन कुमार मिश्रा यांनी श्री राम मंदिराच्या उद्घाटनाचे महत्त्व स्पष्ट केले आणि धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर त्याचा खोल प्रभाव सांगितला.