किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.62°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– पंतप्रधान मोदी यांची ‘मन की बात’मध्ये घोषणा,
नवी दिल्ली, (२९ ऑक्टोबर) – राष्ट्र उभारणीच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका पार पाडण्याची संधी तरुणांना मिळावी, यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी ३१ ऑक्टोबर रोजी देशव्यापी ‘मेरा युवा भारत’ मंच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. ‘मेरा युवा भारत’ संकेतस्थळही सुरू होणार आहे आणि तरुणांनी माय भारत डॉट गव्हर्न्मेंट डॉट इनवर नोंदणी करावी, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून केले. विकसित भारताच्या उभारणीसाठी युवा शक्तीला एकत्रित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे, असे मोदी यांनी सांगितले.
आपल्या संबोधनात त्यांनी ‘लोकल फॉर व्होकल’ धोरणाचा पुनरुच्चार केला. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या सणांच्या काळातही स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या. तुम्ही पर्यटन किंवा तीर्थक्षेत्र यात्रेला जाल, तिथे स्थानिक कारागिरांनी बनवलेली उत्पादने खरेदी करा, अशी विनंती मी करीत असल्याचे मोदी म्हणाले.
यूपीआय डिजिटल पेमेंट प्रणाली वापरा
मोदींनी लोकांना व्यवहारात यूपीआय डिजिटल पेमेंट प्रणाली वापरण्याचा आग्रह धरण्याचे आवाहन केले आणि स्थानिक उत्पादने खरेदी केल्याने कारागिरांसाठी आगामी दिवाळी सणाची चमक पसरेल, असे सांगितले.
खादी उत्पादनांची विक्रमी विक्री
गांधी जयंतीच्या दिवशी खादी उत्पादनांची विक्रमी विक्री झाली. कॅनॉट प्लेस येथील एका स्टोअरने एका दिवसात १.२५ कोटी रुपयांची विक्री केली. खादी उत्पादनांची विक्री पूर्वी केवळ ३० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकत होती. मात्र, आता ती १.२५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, असे मोदी यांनी सांगितले.