किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 32.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 38 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.99° से.
27.3°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (२९ ऑक्टोबर) – कॅश फॉर क्वेरी प्रकरणात २ नोव्हेंबरला उपस्थित राहण्याचा आदेश लोकसभेच्या आचार समितीने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना दिला आहे. आचार समितीने मोईत्रा यांना आधी ३१ ऑक्टोबरला उपस्थित होण्यास सांगितले होते. मात्र, आपण ३१ ऑक्टोबरला उपस्थित राहू शकत नाही, ४ नोव्हेंबरनंतर समितीसमोर उपस्थित राहू शकतो, असे पत्र मोईत्रा यांनी समितीकडे पाठवले होते. समितीने त्यांची ही विनंती फेटाळून लावत, त्यांना २ नोव्हेंबरला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
लोकसभेच्या आचार समितीसमोर उपस्थित राहण्याबाबतची नोटीस मला मिळण्याच्या आधीच वृत्तवाहिन्यांना ही बातमी देण्यात आली, त्याचप्रमाणे माझ्याबाबतच्या तक्रारी आणि पुरावेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे ३१ ऑक्टोबरला मी आचार समितीसमोर उपस्थित राहणार नाही, असे मोईत्रा यांनी म्हटले होते. समितीसमोर उपस्थित राहून माझी बाजू मांडण्यास मी स्वत: उत्सुक आहे, पण माझ्या लोकसभा मतदारसंघात मी अनेक कार्यक्रम घेतले आहेत. हे सर्व कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने तिथे उपस्थित राहणे माझ्यासाठी आवश्यक असल्यामुळे हे सर्व कार्यक्रम आटोपल्यावर म्हणजे ४ नोव्हेंबरनंतर मी कोणत्याही दिवशी समितीसमोर उपस्थित राहू शकते, असे त्यांनी म्हटले होते. महुआ मोईत्रा यांची तक्रार करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे तसेच वकील जय अनंत देहाडराय यांनी २६ ऑक्टोबरला समितीसमोर उपस्थित होत मोईत्रा यांच्याबाबतच्या तक्रारींचा पुनरुच्चार केला होता.