किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवर्धा, (२९ ऑक्टोबर) – दोन वर्षानंतर संघाची शताब्दी साजरी होणार आहे. संघाची स्थापना झाली नाही. कार्य सुरू झाले. ते काम गतिविधींच्या माध्यमातून शताब्दी वर्षात वाढवण्यात येईल. माध्यमं आणि संघाची अभिन्न मैत्री आहे. संघात काय चाललय याचे माध्यमांना कुतूहल असतं. संघाचे काम वाढत असताना माध्यमंही बहूस्पर्शी होऊ लागले आहे. माध्यमांचा राजकारणातच नाही तर विविध विषयात रस असतो. त्या माध्यमांतून चांगले विषय समाजापर्यंत पोहोचतात असतात. मात्र, संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन अराजकीय असावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुजरात-गोवा-महाराष्ट्र पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी दिली. ते रा. स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त वर्धेत आले असता आज २९ रोजी स्थानिक हॉटेल तंदूर येथे आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांची उपस्थिती होती. बापट पुढे म्हणाले की, देश पारतंत्र्यात होता
देशाची सामाजिक स्थितीवर चर्चा, चिंतन झाले आणि डॉ. हेडगेवार यांनी आजपासुन संघाचे काम सुरू होत असल्याचे सांगितले. त्यामुळे शताब्दीचे कार्यक्रम काय असा प्रश्न पत्रकारांनाही पडू शकतो. परंतु, देशात तालुकास्थानापर्यंत संघाचे काम पोहोचले आहे. देशात संघ प्रशिक्षणाची संख्याही वाढते आहे. तृतीय वर्षाचे एका ठिकाणी शिबिर होते. द्वितीय वर्षाचे १२ ते १४ ठिकाणी, प्रथम वर्षाचे ७० वर्ग होतात तर प्राथमिकचे शेकडो वर्ग होत असुन प्रथम आणि प्राथमिकमध्ये १ लाख ४० हजार स्वयंसेवक सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यातून संघाचे काम करण्याचे कौशल्य शिकवले जाते. संघातून प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रात काम केले जाते. अगदी, भारतातून शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त विदेशात गेलेल्यांनी संघ प्रेरणेतून काम सुरू केले. जगात ४३ देशात काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.
संघ शताब्दी म्हणून वेगळे काम करणार नाही. संघाच्या कार्यपद्धतीत गतिविधी असतात. त्यातून सामाजिक परिवर्तनाचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. संघ समाजाचे संघटन असुन सामाजिक दायित्व यशस्वी परिवर्तनापर्यंत नेऊन ठेवण्याचे काम संघ करते. समाजात जाऊन संघ काम करतो. समाज म्हणजे जमाव नाही तर आत्मियता त्याचा आधार म्हणजे कुटुुंब होय. कोरोना काळात कुटुंबाची व्याप्ती वाढत गेल्याचे बापट म्हणाले. सामाजिक समरसतेत दोष शिरले. एकसंघ असलेल्या समाजात भेद निर्माण झाले. त्यामुळे समाज दुर्बल झाला आणि आक्रमणं वाढली. समाज संघटीत राहिला तर कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. परस्परांचा सन्मान व्हावा, विविधतेचा उत्सव व्हावा आणि गतिविधींचे काम वाढावे असे ते म्हणाले. नूतन भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. स्वातंत्र्य म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित करून त्यावेळी ‘स्व’ची जागृती आवश्यक होती. त्यावरच व्यक्ती आणि देश उभा राहतो, असे ते म्हणाले.