किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश– तृणमूल नेत्याच्या विरोधातील सावकारी प्रकरण,
नवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – बेकायदेशीर सावकारीच्या आरोपात अटक करण्यात आलेला तृणमूल काँग्रेसचा प्रवक्ता साकेत गोखलेच्या प्रकरणात राहुल गांधी यांचा निकटवर्ती अलंकार सवाई याची चौकशी करीत अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने त्याचे बयाण नोंदवून घेतले, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सवाईची साकेत गोखलेच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली. सवाई हा राहुल गांधींचा निकटवर्तीय असून, तो त्यांच्या संशोधन पथकाचा प्रमुखही आहे. क्राऊड फंडिंग मंचावरून उभारलेल्या निधीतील अनियमितता प्रकरणी गुजरात पोलिसांनी गोखलेला अगोदरच अटक केली होती. त्यानंतर ईडीने २५ जानेवारी अटक केल्यानंतर सवाईला समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता.
अलंकार सवाईने दिले २३ लाख
अटक केल्यानंतर गोखलेला त्याच्या खात्यात वर्षभरात जमा झालेल्या २३.५४ लाख रुपयांबद्दल माहिती विचारली होती. समाज माध्यमांचे काम आणि सल्लामसलतीसाठी काँग्रेसचा सदस्य अलंकार सवाई याने दिल्याची माहिती त्याने दिली, असे ईडीने गोखलेची कोठडी मागताना न्यायालयात सांगितले होते. सवाई याने हे पैसे का दिले, असा प्रश्न विचारला असता, याचे उत्तर तोच देऊ शकेल, असे गोखलेने सांगितल्याची माहिती ईडीने दिली होती. दिलेल्या सेवेबाबत गोखलेचा सवाईसोबत कोणताही लेखी करार झाला नव्हता, असेही ईडीने स्पष्ट केले.