किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२५ डिसेंबर) – रॉयल एनफिल्ड आणि या कंपनीचे आयकॉनिक मॉडेल ‘बुलेट’ची चर्चा नेहमीच असते. फार पूर्वीपासून हिंदीमध्ये म्हटले जायचे- ‘लेट लेना लेकीन बुलेटही लेना’, आता हे वाक्य शब्दशः खरे ठरत आहे. लोकांच्या बुलेटवर उड्या पडत आहेत. कंपनीने नोव्हेंबर महिन्यात ७५ हजारांपेक्षा जास्त बाईक्सची विक्री केली. यात वार्षिक १४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यात बुलेट मॉडेलची विक्री सर्वाधिक आहे. या वर्षी लाँच केलेल्या नवीन बुलेट ३५० च्या विक्रीत वार्षिक ४१ टक्के वाढ झाली आहे, तर हंटर ३५० च्या विक्रीत घट झाली आहे. ६५० ट्विन्सच्या वार्षिक विक्रीत सुमारे ६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. लोक रॉयल एनफिल्डच्या ६५० सीसी बाईक्सला मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री होणारी बाईक क्लासिक ३५० यंदा देखील टॉपवर आहे. गेल्या महिन्यात ३०, २६४ लोकांनी ही बाईक खरेदी केली. क्लासिक ३५० ची विक्री १३ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात मासिक विक्रीत ५ टक्क्यांची घट दिसून आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये रॉयल एनफिल्डची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक बुलेट ३५० होती, जी १७,४५० लोकांनी खरेदी केली होती. त्यापाठोपाठ हंटर ३५० बाईक १४,१७६ ग्राहकांनी विकत घेतली.
मीटिअर-३५० रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय बाईक्सच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे, जी गेल्या महिन्यात ८,०५१ लोकांनी खरेदी केली होती. या बजेट क्रूझर बाईकच्या विक्रीत मासिक २० टक्क्यांनी घट झाली आहे. यानंतर ६५० ट्विन, म्हणजे कॉन्टिनेंटल जीटी ६५० आणि इंटरसेप्टर ६५०, ज्यांनी गेल्या महिन्यात २,११२ युनिट्सची विक्री केली. या दोन शक्तिशाली बाईक्सच्या विक्रीत वार्षिक सुमारे ६६ आणि मासिक २१ टक्के वाढ झाली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये हिमालयन सीरिजच्या बाईक १,८१४ लोकांनी खरेदी केल्या होत्या, ज्या यंदा मासिक आणि वार्षिक घट दर्शवतात. रॉयल एनफिल्डची सर्वांत कमी विक्री होणारी मोटारसायकल सुपर मीटिअर-६५० आहे, जी १,२७० लोकांनी विकत घेतली आणि ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत तिची विक्री ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे.