किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष,
नवी दिल्ली, (२५ डिसेंबर) – मागील दहा वर्षांपासून पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी नेमके कोणते काम करतात, ते काय करतात, याची माहिती देशातील १५ टक्के लोकांना नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आला आहे.
पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच सी व्होटरने पहिली जनमत चाचणी घेतली. २३ डिसेंबर रोजी पाच राज्यांत लोकांच्या मनातील कल जाणून घेण्यात आला. यात राहुल गांधी यांच्या कामावर जनता किती समाधानी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून सुरू असलेल्या सी व्होटरच्या या सर्वेक्षणात दोन लाखांवर लोकांच्या मतांचा समावेश आहे. यात सहभागी झालेल्या लोकांपैकी सर्वाधिक ३९ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या कामाविषयी असंतुष्ट असल्याचे सांगितले. केवळ २६ टक्के लोकांनी समाधानी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय कमी समाधानी असलेल्या लोकांची संख्या विक्रमी २१ टक्क्यांवर पोहोचली आहे.
विरोधी आघाडी टिकण्याबाबत ५० टक्के लोकांना शंका
सर्वेक्षणाच्या निकालातून असेही स्पष्ट झाले की, देशातील जनतेचा ‘इंडिया’ आघाडीवर फार विश्वास नाही. सर्वेक्षणात सहभागी ५० टक्के लोकांनी निवडणुकीपर्यंतच्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ही युती निवडणुकीपर्यंत टिकणार नाही, याची जनतेला माहिती आहे.