किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– फेस्टीव्हल स्पेशल ट्रेनमुळे प्रवाशांना दिलासा,
नागपूर, (१५ नोव्हेंबर) – दिवाळीच्या सणाला मुळ गावी जाणारे प्रवासी रेल्वेतूनच प्रवास करीत असतात. अशावेळी रेल्वे गाड्यांमध्ये तुफान गर्दी असते. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी हजारो रेल्वे कर्मचारी २४ तास सेवा देत असतात. मध्य रेल्वेने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ३७१ मेल एक्सप्रेस गाड्या, १३३ प्रवासी गाड्या आणि ४६ फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन अशा ५५० ट्रेनची प्रवाशांना सेवा दिल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख शिवराज मानसपुरे यांनी दिली आहे.
कर्मचारी रात्रंदिवस कामावर
प्रवाशांना सेवा देताना रेल्वेचे मोेटरमन, लोकोपायलट, ट्रेन मॅनेजर, नियंत्रक, स्टेशन मास्तर, टीटीई, आरपीएफ जवान, पॉइंट्समन, बुकिंग कर्मचारी, ट्रॅकमन, ट्रेन परिक्षण कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी रात्रंदिवस कामावर होते. त्यामुळे सर्व प्रवाशांना वेळेवर घरी जाता आले आहे. आपल्या आप्तस्वकियांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करुन देण्याचा खरा आनंद रेल्वेमुळे शक्य झाले आहे. सणासुदीच्या काळात अनेकजण सुटीवर असतात परंतू रेल्वेचे अनेक कर्मचारी कामावर आल्याने रेल्वे धावत होती. सुटी न घेता कामावर हजर असलेल्या रेल्वे कर्मचार्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखद झाला आहे.
रेल्वेचे विशेष नियोजन
कोरोनाच्या संक्रमण काळात अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. अनेक मार्गावरील रेल्वे बंद असल्याने दिवाळीतील गर्दी कमी होती. परंतू आता पुन्हा दुप्पट गर्दी वाढल्याने रेल्वेगाडयांची संख्या वाढविण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. सणोत्सवाकरिता स्पेशल रेल्वे सुरु केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाने विशेष नियोजन करीत ५५० रेल्वेगाड्या चालविल्या. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपर्यंत ७ लाख, ५० हजार प्रवाशांची अतिरिक्त वाहतूक करण्यात रेल्वेला यश मिळाले आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेने २७० रेल्वेगाड्या चालविल्या होत्या.