किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशश्रीनगर, (२६ डिसेंबर) – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पूंछ सेक्टरला भेट देऊन तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी त्यांना दहशतवादविरोधी कारवाई आणि सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
राजौरी सेक्टरमधील डेरा की गलीच्या जंगल परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू आहे. यामुळे पूंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी राजौरी सेक्टरमधील थानंडीजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. त्यात चार जवान हुतात्मा, तर तीन जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर २२ डिसेंबर रोजी बाफलियाज भागात ३ नागरिकांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे आढळून आले होते.
दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांनी कोठडीत छळ झाल्याचा आरोप केल्यानंतर लष्कराने या घटनेच्या अंतर्गत चौकशीचा आदेश दिला आहे. आणखी पाच नागरिकांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २७ ते ४२ वयोगटातील तीन व्यक्तींना दहशतवादी हल्ल्याशी संबंधित चौकशीसाठी लष्कराने ताब्यात घेतले होते. त्यांचा छळ केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जम्मू-काश्मीर पोलिस सीआरपीसीच्या कलम १७४ नुसार नागरिकांच्या मृत्यूची चौकशी करीत आहेत, तर लष्कराने तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.