किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– जवानांची मारक क्षमता वाढणार,
नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – भारतीय लष्कराच्या जवानांना त्यांची मारक क्षमता वाढवण्यासाठी आणखी ७० हजार सिग सॉर असॉल्ट रायफल मिळणार आहेत. दहशतवादविरोधी कारवाया आणि इतर कर्तव्यात तैनात असलेल्या सैनिकांना या रायफल्स दिल्या जातील. संरक्षण मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या खरेदीला मंजुरी देण्यात आली आणि त्यात लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी कारवायांविरुद्ध आणि चीनसोबतच्या लष्करी संघर्षात तैनात असताना भारतीय लष्कराला ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ७० हजारांपेक्षा जास्त असॉल्ट रायफल्स खरेदी करण्यास मंजुरी मिळाली, असे ते म्हणाले.
भारताने यापूर्वीच या अमेरिकन बनावटीच्या ७० हजारांपेक्षा जास्त असॉल्ट रायफल्सचा समावेश केला आहे, त्या लडाख सेक्टरमध्ये आणि काश्मीर खोर्यात चीनच्या आघाडीवर वापरल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या रायफल घ्यायच्या असल्याने या रायफल खरेदी करण्याचा विचार लष्कराने सुरुवातीला केला होता. फेब्रुवारी २०१९ मध्ये, अमेरिकेच्या सिग सॉरकडून ७२,४०० सिग-७१६ रायफली खरेदी करण्यात आल्या, त्यापैकी ६६,४०० लष्करासाठी, ४,००० हवाई दलासाठी आणि २,००० नौदलासाठी होत्या. सिग-७१६ असॉल्ट रायफलची उच्च क्षमता आणि विस्तारित श्रेणीमुळे अनेक पातळीवर निवड केली गेली. ती इन्सास रायफल किंवा एके-४७ पेक्षा जास्त प्राणघातक आहे. अमेठीजवळील आयुध निर्माणीमध्ये दोन कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून तयार होत असलेली एके-२०३ लवकरच भारतीय लष्कराला पुरवली जाणार आहे.