किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– तब्बल ५७ देशांचे ‘काळजीपोटी’ निवेदन,
नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – भारत सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी, जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर जगभरातील ५७ देशांना काश्मीरची चिंता वाटते आहे. विशेषत: भारत सरकारच्या निर्णयावर, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर, या इस्लामिक देशांना काश्मीरची चिंता वाटत असून, त्यांनी एक संयुक्त बयाण जारी केले आहे.
ओआयसी म्हणजेच इस्लामिक सहयोग संघटनेने भारत सरकारने एकतर्फी निर्णय घेत कारवाई केल्याचा ठपका ठेवत, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्याने आपल्याला चिंता वाटत असल्याचे या देशांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘ओआयसी आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ ऑगस्ट २०१९ पासून या संदर्भात घेण्यात आलेल्या सर्व अवैध आणि एकतर्फी निर्णयांना मागे घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा करीत आहे,’ असं संबंधित निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. ओआयसीने भारताला सल्ला देत, जम्मू-काश्मीरच्या लोकांना आत्मनिर्णयाच्या अधिकारासोबत ओआयसी ठामपणे उभे असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने यात हस्तक्षेप करावा, असं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या तरतुदींनुसार, जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर उपाय शोधला जावा, असंही ओआयसीने म्हटलं आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्ताननेही प्रतिक्रीया दिली असून, जम्मू-काश्मीर हा एक आंतरराष्ट्रीय वाद असून गेल्या ७० वर्षांपासून तो संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या विचाराधीन आहे. याविषयी अंतिम निर्णय, संयुक्त राष्ट्राचे प्रस्ताव आणि काश्मीरी नागरिकांच्या इच्छेनुसार व्हायला हवा. काश्मीरी लोक आणि पाकिस्तानच्या इच्छेविरुद्ध असा कोणताही निर्णय घेण्याचा भारताला अधिकार नाही,’ अशा शब्दांत पाकिस्तानने आपली वैचारीक दिवाळखोरी जाहीर केली आहे. दरम्यान, २०१९ मध्ये हा निर्णय जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने भारतावर टीका केली होती. त्यानंतर, पाकिस्तानने भारतासोबतचे राजनायिक आणि व्यापारी संबंध तोडले आणि समझोता तसंच थार एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता.