किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– दहशतवाद कट प्रकरण
नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – दहशतवाद कट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने बंगळुरूतील सहापेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी केली. एनआयएच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. काही अज्ञात लोकांनी सोमवारी रात्री बंगळुरूतील राज भवन बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. मात्र, तपासानंतर पोलिसांनी ही एक अफवा असल्याचे स्पष्ट केले.
दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा संशय असलेल्यांवर ही छापेमारी सुरू आहे. एनआयएने ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध भागांत छापेमारी करून १५ अतिरेक्यांना अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी एनआयएच्या पथकाने महाराष्ट्रातील पुणे, मीरा रोड, ठाणे आणि कर्नाटकातील बंगळुरूसह ४४ ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीच्यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड, तीक्ष्ण आणि अणकुचीदार शस्त्रे, आक्षेपार्ह दस्तावेज, स्मार्टफोनसह इतर काही उपकरणे जप्त केली होती. इसिसच्या महाराष्ट्र मोड्युलमधील सदस्य महाराष्ट्रातूनच काम करीत असल्याची माहिती यावेळी समोर आली होती. हे अतिरेकी सरकारच्या विरोधात युद्ध छेडण्याच्या तयारीत होते, अशी माहिती छापेमारीत समोर आली होती.