किमान तापमान : 25.33° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.5 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलकेंद्र सरकारने नोंदविली मोठी मागणी, ‘कोर्बेवॅक्स’च्या ३० कोटी मात्रा राखीव,
नवी दिल्ली, १६ जुलै – भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला असतानाच आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने लसींचे तब्बल १४ हजार ५०५ कोटी रुपये किमतीच्या ६६ कोटी मात्रा मागविल्या आहेत. ज्यामुळे देशातल्या लस उपलब्धतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने चांगला वेग घेतला आहे. आतापर्यंत एकूण ३९ कोटी ५३ लाख ४३ हजार ७६७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. आता मोदी सरकारने आणखी लसींच्या मात्रांची मागणी नोंदविली आहे. ही ऑर्डर आतापर्यंतची सर्वांत मोठी ऑर्डर ठरणार आहे. त्यामुळे लवकरच देशाला लसींच्या ६६ कोटी मात्रा उपलब्ध होणार आहेत.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या १४,५०५ कोटी किमतीच्या मात्रा भारत सरकारने मागविल्या आहेत, ज्यामुळे देशातील लस उपलब्धतेत निश्चितच वाढ होणार आहे. २६ जून रोजी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात १३५ कोटी मात्रा उपलब्ध करून देण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. ते समोर ठेवूनच ही मोठी मागणी नोंदविण्यात आली आहे. या ६६ कोटी मात्रांव्यतिरिक्त सरकारने कोर्बेवॅक्स या लसीच्या ३० कोटी मात्रा अग्रीम रक्कम देऊन राखीव ठेवल्याची माहिती एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकाने दिली आहे. याचाच अर्थ ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशात एकूण ९६ कोटी मात्रा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. या ९६ कोटी मात्रा केंद्राच्या ७५ टक्क्यांच्या वाट्यांमधील असतील. या व्यतिरिक्त खाजगी क्षेत्रामध्ये या कालावधीत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या २२ कोटी मात्रा उपलब्ध होणार आहेत. या मात्रांमुळे वर्षाअखेरीपर्यंत देशातल्या १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत होणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीतील कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांचे एकूण उत्पादन ८८ कोटी इतके ठरविण्यात आले आहे. जुलैमध्ये ३.५ कोटींची घट झाली असली तरी या कालावधीत कोव्हॅक्सिनच्या ३८ कोटी मात्रांचे उत्पादन घेण्यात आले.
स्पुटनिक, झायडसचाही समावेश
कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कोर्बेवॅक्स यांच्या व्यतिरिक्त सरकारच्या १३५ कोटी मात्रांमध्ये स्पुटनिक व्ही आणि झायडस कॅडिला या लसींच्या मात्रांचाही समावेश आहे. स्पुटनिक व्ही लसीचे स्थानिक उत्पादन अद्याप सुरू व्हायचे आहे तर झायडस कॅडिला या लसीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. केंद्राच्या अहवालानुसार, स्पुटनिक व्हीच्या १० कोटी मात्रा तर झायडस कॅडिलाच्या पाच कोटी मात्रा या वर्षात उपलब्ध होणार आहेत.