किमान तापमान : 25.5° से.
कमाल तापमान : 27.83° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 9.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.83° से.
23.58°से. - 28.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलसर्वोच्च न्यायालयाची कावड यात्रेवर भूमिका,
नवी दिल्ली, १६ जुलै – कावड यात्रा प्रतीकात्मक पद्धतीने आयोजित करण्याच्या आपल्या निर्णयावर उत्तरप्रदेश सरकारने पुन्हा विचार करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी दिला. धार्मिक भावनांपेक्षा मनुष्याचा जीवन जगण्याचा अधिकार महत्त्वाचा आहे, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
न्या. आर. एफ. नरिमन आणि न्या. भूषण गवई यांच्या दोन सदस्यीय न्यायासनापुढे आज या प्रकरणी सुनावणी झाली. कावड यात्रेला आमचा स्पष्ट विरोध असल्याची भूमिका यावेळी केंद्र सरकारच्या वतीने मांडण्यात आली. कावड घेऊन आपल्या भागातील मंदिरात जाण्यापेक्षा टँकरद्वारे ठिकठिकाणी गंगाजल पोहोचविण्यात यावे, अशी सूचना केंद्राने केली. कोरोनाचे संकट कायम असताना प्रतीकात्मक कावड यात्रादेखील काढायला नको, याची दक्षता उत्तरप्रदेश सरकारने घ्यायला हवी, अन्यथा आम्हाला आवश्यक तो आदेश पारित करावा लागेल, असे न्यायालयाने सांगितले.
केंद्र सरकारची भूमिका महान्यायाभिकर्ता तुषार मेहता यांनी मांडली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, कोणत्याही राज्याने कावड यात्रेला परवानगी द्यायला नको, असे ते म्हणाले. तिथेच आम्ही आधीच कावड यात्रेवर बंदी घातली असल्याची माहिती उत्तराखंड सरकारने दिली. उत्तरप्रदेश सरकारची बाजू मांडताना, सरकारी वकील सी. एस. वैद्यनाथन् म्हणाले की, कावड यात्रेचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन ही परवानगी देण्यात आली. वाढते लसीकरण व नकारात्मक कोरोना अहवाल हा निकष आम्ही ठेवला आहे.
सर्वांना जगण्याचा मूलभूत अधिकार
आम्ही तुम्हाला विचार करण्याची आणखी एक संधी देऊ इच्छितो. यात्रेला परवानगी दिली जावी अथवा नाही, यावर सोमवारपर्यंत विचार करा. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. सर्वांना जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. अन्यथा आवश्यक ते आदेश द्यावे लागतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.