किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.11°से. - 25.77°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १७ जुलै – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्र्यांची या अधिवेशनातील ही पहिलीच परीक्षा असणार आहे. या अधिवेशनात एकूण २३ विधेयक सरकारकडून प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६ जुनी तर १७ नवी विधेयके आहेत.
शेतकरी आंदोलन, कोरोनाची दुसरी लाट आणि तिसर्या लाटेची भीती तसेच केंद्र सरकारची व्यापक लसीकरण मोहीम या पृष्ठभूमीवर हे अधिवेशन होत आहे.
१९ जुलै ते १३ ऑगस्ट असा अधिवेशनाचा कालावधी आहे. कोरोनामुळे मागच्या अधिवेशनात संसदेची दोन्ही सभागृहे दोन सत्रात चालवावी लागली होती. यावेळी मात्र दोन्ही सभागृहे एकाचवेळी सकाळी ११ ते ६ या वेळेत चालणार आहेत. ज्या खासदारांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत, त्यांना आरटी-पीसीआर चाचणीची गरज उरलेली नाही.
ही विधेयके प्रस्तावित
डीएनए तंत्रज्ञान वापर नियमन विधेयक : डीएनए तंत्रज्ञानाचा वापर केवळ ठरावीक पद्धतीनेच करता यावा, त्यातले गैरप्रकार टाळण्यासाठी विधेयक तसेच पेन्शन फंडसंदर्भात सरकारने अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या, त्यानुसार एनपीएस ट्रस्ट पेन्शन फंडपासून वेगळे करणारे विधेयक, सामान्य लोकांच्या बँकेतल्या ठेवींना विमा संरक्षण देणारे ठेव विमा दुरुस्ती विधेयक, वीज वितरणात खाजगी कंपन्यांनाही अधिक मुभा देणारे वीज वितरण दुरुस्ती विधेयक या महत्त्वाच्या विधेयकांसह विविध विषयांवरील एकूण २३ विधेयके येत्या पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार आहेत. क्रिप्टो करन्सीला प्रतिबंधित विधेयक तूर्तास मांडले जाणार नाही.