किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 31.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.63° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– अश्विनी वैष्णव यांची माहिती,
नवी दिल्ली, (२ फेब्रुवारी ) – लातूर येथील रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरी, कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्याप येथे होऊ शकलेली नाही. मात्र, आता ‘वंदे भारत’ची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार आहे. लातूरसह चेन्नई, सोनिपत, रायबरेली येथे ‘वंदे भारत’च्या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील १,२७२ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. नवी दिल्ली, कानपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, अहमदाबाद आणि लखनौसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांसह पुरी, जोधपूर, गांधीनगर आणि जयपूरमधील लहान-मोठ्या रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी हायड्रोजन रेल्वेगाडीची सुरुवात डिसेंबर २०२३ मध्ये करण्यात येणार आहे. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची रेल्वेगाडी असेल. कालका ते सिमला या हेरिटेज सर्किट मार्गावर पहिली हायड्रोजन रेल्वे धावणार आहे. त्यानंतर देशातील प्रमुख पर्यटन ठिकाणांवर ही रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रामायण सर्किट, जगन्नाथ सर्किट, काशी विश्वनाथ सर्किट अशा अवघड मार्गांवरदेखील भारत गौरव रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. या वर्षी बुलेट ट्रेनच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
लातूर कोच फॅक्टरीची वैशिष्ट्ये
लातूर शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे. ३५० एकरवरील क्षेत्र आहे. यापैकी १२० एकरवरील बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात एका महिन्यात १६ कोच निर्मिती शक्य आहे तर, वर्षाला २५० कोच. दुसर्या टप्प्यात वर्षाला ४०० कोच आणि तिसर्या टप्प्यात वर्षाला ७०० कोचेसची निर्मिती केली जाणार आहे.