किमान तापमान : 29.34° से.
कमाल तापमान : 30.44° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.44° से.
27.62°से. - 30.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– तब्बल ५० हजार वर्षांनंतर पृथ्वीजवळून जाणार,
नवी दिल्ली,(२ फेब्रुवारी )- विविध खगोलीय घटना मानवाला नेहमीच आकर्षित करीत असतात. अशीच एक घटना आज म्हणजे २ फेब्रुवारीच्या रात्री आणि ३ फेब्रुवारीच्या पहाटे घडणार आहे. आज उत्तररात्री पृथ्वीच्या अगदी जवळून हिरव्या रंगाचा धूमकेतू जाणार आहे. याआधी हा धूमकेतू आला तेव्हा पृथ्वीवर हिमयुुग असावे, असा खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. हा हिरव्या रंगाचा धूमकेतू सामान्य डोळ्यांनी आणि दुर्बिणीशिवाय पाहता येणे शक्य आहे, हे विशेष !
‘ग्रीन कॉमेट’ अर्थात हिरव्या धूमकेतूचे शास्त्रीय नाव सी/२०२२ई३(झेडटीएफ) असे आहे. तब्बल ५० हजार वर्षांनंतर हा धूमकेतू दिसणार असून यानंतर पुन्हा ५० हजार वर्षांनंतरच तो पृथ्वीवासियांना दिसेल. आपल्या भागात आकाश निरभ्र असेल तर साध्या डोळ्यांनी आणि कोणत्याही उपकरणाचा वापर न करता, हा धूमकेतू बघता येईल. या धूमकेतूविषयी शास्त्रज्ञांना मार्च २०२२ मध्ये माहिती मिळाली. कॅलिफोर्नियातील वैज्ञानिक या धूमकेतूच्या मागावर होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धूमकेतू पृथ्वीपासून साधारण साडे चार कोटी किलोमीटर अंतरावरून जाईल.
नासाच्या टेलिस्कोपने या हिरव्या धूमकेतूची छायाचित्रे टिपली असून, ती प्रसिद्ध केली आहेत. तसे पाहता, धूमकेतूंच्या जाण्या-येण्याचा मार्ग निर्धारीत नसतो मात्र, हा धूमकेतू ताशी अडीच लाख किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीसमोरून जात आहे. पहाटे सुर्योदय होण्यापूर्वी हा धूमकेतू दिसणार आहे. या धूमकेतूची ऊर्जा कमी झाल्याने त्यावर बर्फसदृश वस्तू गोळा झाली आहे. त्यावर सूर्याचा प्रकाश पडल्याने विविध रंग परावर्तित होतात. यातून निघणा्या अल्ट्राव्हॉयलेट रेडीएशनमुळे धूमकेतू हिरव्या रंगाचा दिसत असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.