किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलसरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव,
त्याग, बलिदानामुळे मिळाले स्वातंत्र्य,
एकात्मता हीच भारताची खरी शक्ती,
नागपूर, १६ ऑक्टोबर – घुसखोरी आणि इतर कारणांमुळे देशात लोकसंख्येचा असमतोल निर्माण होऊ शकतो. देशातल्या अवैध घुसखोरांवर नजर ठेवण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी तसेच सर्व समाजघटकांसाठी लोकसंख्या धोरण अत्यावश्यक आहे. पुढील ५० वर्षांचा विवेकी विचार करून त्यात सुधारित धोरणावर पुनर्विचार होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपुरात केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगरतर्फे रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात शुक्रवार १५ ऑक्टोबरला सकाळी आयोजित विजयादशमी उत्सवात डॉ. भागवत यांचे उद्बोधन झालेे. याप्रसंगी विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे व्यासपीठावर उपस्थित होते.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, देशाचे स्वातंत्र्य हे त्याग आणि बलिदानामुळे मिळाले. इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. हे मौलिक स्वातंत्र्य भेदभावरहित समाजातूनच टिकू शकते. सनातन काळापासून एकात्मता ही भारताची शक्ती आहे. भारत विकासाच्या मार्गावर जात असताना हिंदू समाज स्वत्वाला समजू शकू नये यासाठी इतिहास, व्यवस्था, वर्तमानाची निंदा करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे प्रयत्न काही घटक करताहेत. प्राचीन मूल्यांवर हल्ला होतोय् व सूक्ष्म माध्यमातून सांस्कृतिक आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो आहे. या शक्तींची आता हातमिळवणी झाली आहे. भारतात अशा अनेक व्यक्ती आणि संघटना आहेत, संविधानांतर्गत आपण सर्व एकाच देशाचे आहोत. व्यवस्था फेडरल असली तरी लोक फेडरल नाहीत. सत्तेत बसलेल्या लोकांकडून पोषक व्यवहार होत नाही, मग समाजाला दिशा कशी मिळणार, असा सवाल त्यांनी केला. राजकारणातील काही लोक स्वार्थासाठी कपट करतात. असंतोष निर्माण करण्याचे, जाती, प्रदेश, भाषेच्या माध्यमातून अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तंत्रज्ञानाचा आधार घेत आगीत तेल ओतण्याचे काम होते आहे. ओटीटी हा त्यातलाच एक प्रकार आहे. त्यावर कसे- कसे चित्रपट येतात. ओटीटीवर नियंत्रण नाही. आता तर मुलांकडे मोबाईल आला आहे. त्याचा वापर प्रत्यक्षात कसा केला जातोय्, हे कुणीही पाहत नाही. शातील तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढतेय, त्यावर नियंत्रण नाही. त्यातून येणार्या पैशांतून देशविरोधी कारवाया होतात, असे डॉ. भागवत म्हणाले.
समाजहितासाठी या बाबींना नियंत्रित करण्याचे काम शासनालाच करावे लागेल. मात्र, प्रत्येक नागरिकाची सुद्धा काही जबाबदारी आहे. मनावर नियंत्रण गरजेचे आहे. स्वत:च्या भाषेचा शक्य तेवढा वापर हवा. ‘स्व’चा विसर नको. स्वभाषा, वेषभूषा, संस्कार, भजन, भोजन याबाबत कुटुंबात चर्चा हवी. आपली संस्कृती, कौटुंबिक मूल्ये रुजवली तरच ते शक्य आहे. घरातूनच बालकांवर संस्कार होतात, तेथून त्यांचे मन तयार होते, त्यांच्यात विवेक जागृत होतो. कुटुंब प्रबोधनातूनच त्यांच्या मनावर नियंत्रण आणले जाऊ शकते, असेही डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.
प्रचलित जागतिक आर्थिक व्यवस्थेमुळे प्रचंड अडचणी निर्माण झाल्याने नव्या व्यवस्थेची गरज आहे. ‘संयमाने उपभोग’ यावर आधारित भारतीय अर्थविचार जगाला मार्ग दाखवू शकतो, याकडे मोहनजींनी लक्ष वेधले. समाज जोडणारी भाषा करायला हवी, समाज तोडणारी नव्हे. मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले सरसंघचालक…
– प्रत्येक गावात पाच ते सात कोरोनायोद्धा, संघाचे देशपातळीवर प्रशिक्षण.
– स्वतःच्या घरासोबतच मोहल्ला स्वच्छतेवर भर.
– आजारी कसे पडू नये यावर आयुर्वेदात पूर्ण प्रकरण.
– सार्वजनिक आरोग्यावर अनेक प्रयत्न करावे लागतील.
– लोकआरोग्याच्या नियमांचे पालन गरजेचे.
– नैसर्गिक आरोग्यशैली हवी
– रासायनिक शेतीने कर्करोग वाढेलच.
– पाण्याचा उपयोग नियंत्रित.
– प्लॅस्टिकचा उपयोग कमीत कमी.
– सिंगल युज प्लॅस्टिक नकोच.
– वृक्षारोपण वाढवायला हवे.
– सर्व पॅथींना मान्यता हवी. पॅथीचा अहंकार नको.
– चीन, पाकिस्तान बदललेला नाही. प्रेम, अहिंसेतून हृदयपरिवर्तन.
– सीमा सुरक्षा, समुद्री सीमा बळकट हवी. सायबर सिक्युरिटीवर बरेच प्रयत्न गरजेचे.
– जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा तातडीने बंदोबस्त व्हावा.
– हिंदू मंदिरांची संपत्ती अहिंदूंसाठी दिली जात आहे.
– सरकार काही काळच मंदिरांचे व्यवस्थापन चालवू शकते. नंतर ती परत द्यावी.
४८ भागांत कार्यक्रम
कोरोना परिस्थितीमुळे स्मृती मंदिर परिसरात निवडक स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या स्मृतिस्थळावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पुष्पांजली अर्पण केली आणि शस्त्रपूजन केले.
ऋ घोषपथकाने विविध रचनांचे वादन करतानाच साकारलेले धनुष्यबाण लक्षवेधक होते. नियुद्ध, दंड क्रमिकांचे प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी सादर केले.
ऋ याशिवाय शहरात ४८ भागांतील मैदानांवर स्वयंसेवकांनी व्यायामयोग, दंड योगाची प्रात्यक्षिके सादर केली. ‘बढ रहे है चरण अगणित ध्येय के पथपर निरंतर’ हे गीत स्वयंसेवकांनी सांघिक म्हटले.
ऋ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, कार्यवाहिका सीतागायत्री अन्नदानम्, मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी या कार्यक्रमाला उपस्थित होते.