किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलसोनिया गांधींनी जी-२३ नेत्यांना ठणकावले,
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – कॉंग्रेसची मी स्थायी अध्यक्ष आहे, पक्षातील सर्व निर्णय मीच घेत असते, पक्षातील नेत्यांना जे वाटते, ते त्यांनी समोर येऊन स्पष्टपणे माझ्याशी बोलावे, या शब्दांत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज शनिवारी बंडखोर नेत्यांना खडसावले.
कॉंग्रेस कार्यसमितीची बहुचर्चित बैठक आज कॉंग्रेस मुख्यालयात झाली, या बैठकीत श्रीमती सोनिया गांधी यांनी जी २३ च्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. पक्षाची मी स्थायी अध्यक्ष आहे, त्यामुळे माझ्याशी चर्चा करण्यासाठी कोणीही वृत्तपत्रांची मदत घेण्याचे कारण नाही, असे त्या म्हणाल्या.
तुम्ही मला बोलण्याची परवानगी देत असाल तर मी सांगू इच्छिते की, मी पक्षाची पूर्णवेळ आणि सक्रिय अध्यक्ष आहे. मला स्पष्ट बोलणारे नेहमीच आवडतात. त्यामुळे माझ्याशी कोणी माध्यमांच्या माध्यमातून चर्चा करण्याची गरज नाही. कार्यसमितीच्या बैठकीत खुली आणि मोकळी चर्चा होत असते, कार्यसमितीच्या बैठकीतील निर्णयच फक्त बाहेर जायला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत गांधी म्हणाल्या की, आमच्यासमोर आव्हाने अनेक आहेत, पण आम्ही एकजूट आणि अनुशासित राहिलो आणि पक्षहिताचाच विचार केला तर, या निवडणुकांत आमची कामगिरी चांगली राहू शकते.
पक्षात शिस्त आवश्यक
कॉंग्रेस पुन्हा मजबूत व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र, पक्षांतर्गत ऐक्य आणि पक्षहिताला सर्वोच्च प्राथमिकता देण्यासोबत आत्मनियंत्रणाची तसेच शिस्तीची नितांत गरज आहे, असे त्या म्हणाल्या. कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जून महिन्यातच निवडला जाणार होता, पण देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलावी लागली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. लखीमपूर खिरी येथील हिंसाचाराच्या घटनेवरुन भाजपाच्या मानसिकतेची ओळख पटते, असे त्या म्हणाल्या.
नवा अध्यक्ष ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये
पुढील वर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्याचा निर्णय कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष पुढील वर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या दरम्यान कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, असे कॉंग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्याआधी सर्व पातळ्यांवरील संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे ते म्हणाले. बैठकीत उपस्थित बहुतांश नेत्यांनी राहुल गांधींनीच पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी आग्रही मागणी केली. यावर विचार करण्याची तयारी राहुल गांधी यांनी दर्शवली. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारत नाही, तोपर्यंत पदावर कायम राहण्याची तयारी सोनिया गांधी यांनी दर्शवली.