किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलसर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल,
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – सिंघुच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन स्थळावर झालेल्या हत्येनंतर सर्वोच्च न्यायालयात आज शनिवारी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत नुकत्याच झालेल्या हत्येचा उल्लेख करतानाच, या मुद्यावर प्रलंबित याचिकांवर तातडीने सुनावणी करण्याची, तसेच दिल्लीच्या सीमांवरून आंदोलकांना तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रख्यात वकील शशांक शेखर झा यांच्यामार्फत स्वाती गोयल आणि संजीव नेवार यांनी आपल्या प्रलंबित याचिकेत ही अंतरिम याचिका न्यायालयात दाखल केली. हे आंदोलन असेच कायम राहिल्यास देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. अशा प्रकारची सर्वच आंदोलने रोखण्याचे, तसेच कोरोना महामारी संपुष्टात येईपर्यंत, या आंदोलनांना परवानगी देऊ नये, असा आदेश केंद्र सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना दिला जावा, अशी विनंती स्वाती गोयल आणि संजीव नेवार यांनी न्यायालयाकडे केली आहे.
मानवताविरोधी कृत्ये दिसून येणारे आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ नये. या आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनाला आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला, एका महिलेवर अत्याचाराची घटना घडली. आता दसर्याला लखबीरसिंग नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटना अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटकाळात सण साजरे करण्यास, मंदिरांमध्ये जाण्यास, शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्यास प्रतिबंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आंदोलनांना परवानगी देणे योग्य ठरणार नाही. आंदोलक स्वतःसोबतच देशातील लाखो लोकांचा जीव धोक्यात टाकत आहेत. कोरोना काळात दीर्घकाळ चालणार्या आंदोलनाला परवानगी दिली जाऊ शकत नाही. सार्वजनिक ठिकाणांवर दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली आहे. नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण केले जात आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.