किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्वाळा,
नवी दिल्ली, (२३ फेब्रुवारी) – सरकारी धोरणांचा आढावा घेण्यात न्यायालयांना अतिशय मर्यादित वाव आहे तसेच एखाद्या विशिष्ट योजनेचीच अंमलबजावणी केली जावी, असा आदेशही आम्ही राज्य सरकारांना देऊ शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. उपासमार आणि कुपोषणावर आळा घालण्यासाठी कम्युनिटी किचन योजना सुरू करण्यात यावी, अशी विनंती एका जनहित याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. ही याचिका निकाली काढताना न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. पंकज मिठाळ यांच्या न्यायासनाने हा निकाल दिला.
केंद्र आणि राज्यांतर्फे आधीपासूनच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि अन्य कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी राज्यांना कोणताही आदेश देऊ शकत नाही. राज्यांच्या धोरणांचा आढावा घेण्याचे अधिकार आम्हाला असले, तरी तिथेही काही मर्यादा आहे. त्याच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. अमूक योजना जनतेच्या हितात आहे आणि इतर योजनांच्या तुलनेत ती फार चांगली असल्याने राज्य सरकारांनी तीच योजना अंमलात आणावी, असा कुठलाही आदेश आम्ही देऊ शकत नाही. आपल्या नागरिकांसाठी कोणती कल्याणकारी योजना सादर करायला हवी, हा अधिकार राज्य सरकारांनाच घ्यायचा आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.