किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, २ नोव्हेंबर – व्याप्त काश्मीरसह गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या भागावर सध्या पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितले.
गिलगिट-बाल्टिस्तानवर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे आणि पाकिस्तान या प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याचा प्रयत्न करीत आहे. व्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग आहे, अशा दोनच शब्दांत आमचे सरकार याबाबतची भूमिका स्पष्ट करीत आहे, असे त्यांनी या मुद्यावर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले.
भारताचे विभाजन व्हावे अशी आमची इच्छा नव्हती. मात्र, ते दुर्दैवाने झाले आहे. पाकिस्तानातील हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांसोबत पाकिस्तान सरकार कसा व्यवहार करीत आहे, हे तुम्ही जाणताच. या देशात धार्मिक छळाला सामोर्या जाणार्यांसाठीच आम्ही नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणला, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्गटले आहे.
पुलवामा हल्ल्याबाबत कॉंग्रेस यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अंगुलीनिर्देश करायची. मात्र, हा हल्ला आम्हीच घडवल्याची कबुली पाकिस्तानने दिल्यानंतर कॉंग्रेसने मिठाच्या गुळण्या धरल्या, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. पंतप्रधान मोदींवर संशय व्यक्त करून कॉंग्रेसने पुलवामा हल्ल्याबाबत टीका केली होती. पण, पाकिस्तानी मंत्र्याने हा हल्ल्याची कबुली संसदेत दिल्यानंतर कॉंग्रेसने का मौन धारण केले, असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर उपस्थित केला.
चीनची घुसखोरी नाही
पूर्व लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही, अशी टीका त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी चिनी लष्कराने भारती हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपावर केली. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, पूर्व लडाखमधील स्थिती नियंत्रणात असून, चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे वृत्त निराधार आहे.
आधी रिकामे करा!
गिलगिट-बाल्टिस्तानला तात्पुरत्या प्रांताचा दर्जा देण्याच्या निर्णयावर भारताने आज सोमवारी जोरदार हल्ला चढविला. हा प्रांतच नाही, तर संपूर्ण व्याप्त काश्मीर भारताचे असल्याने, हा दर्जा घटनाबाह्य आहे. पाकिस्तानने हा प्रांत तत्काळ रिकामा करावा, अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ठणकावून सांगितले.
पाकिस्तानने बेकायदेशीर रीत्या भारताच्या भूभागावर अतिक्रिमण केले होते. हा संपूर्ण प्रांत आमचा असल्याने, त्याला दिलेला तात्पुरता दर्जा भारत कधीच स्वीकारणार नाही, असे त्यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
अशा प्रकारच्या कुरापती करून, पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये सुरू असलेले मानवी हक्काचे उल्लंघन जगापासून लपवू शकत नाही. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तान सरकार आणि तेथील लष्कर नागरिकांना स्वातंत्र्य नाकारत आहे. सरकारविरोधात आजवर ज्यांनी आवाज उठविला, त्यांना ठार मारण्यात आले आहे, या प्रांतात अजूनही पाकिस्तान सरकारविरोधात प्रचंड रोष आहे, असा आरोपही श्रीवास्तव यांनी केला.