किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.7°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – मेटा-मालकीच्या व्हॉट्स अॅपने नवीन आयटी नियम-२०२१ चे पालन करून ऑक्टोबर महिन्यात भारतात ७५ लाखांहून अधिक चुकीच्या खात्यांवर बंदी घातली आहे. १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान कंपनीने ७५,४८,००० खात्यांवर बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे.
व्हॉट्स अॅपने आपल्या मासिक अनुपालन अहवालात म्हटले आहे की, वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी, यापैकी सुमारे १९,१९,००० खात्यांवर बंदी घालण्यात आली होती. देशातील ५०० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या सर्वांत लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मला ऑक्टोबरमध्ये देशात विक्रमी ९,०६३ तक्रारी प्राप्त झाल्या आणि विक्रमी १२ कारवाई करण्यात आली. अकाऊंट्स अॅक्शनचा संदर्भ असा आहे की, जेथे व्हॉट्स अॅपने अहवालाच्या आधारे योग्य कारवाई केली आहे आणि कारवाई करणे म्हणजे एकतर खाते प्रतिबंधित करणे कींवा पूर्वी प्रतिबंधित केलेले खाते पुनर्संचयित करणे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या वापरकर्ता-सुरक्षा अहवालात वापरकर्त्यांच्या तक्रारींचा तपशील आणि व्हॉट्स अॅपद्वारे केलेल्या कारवाईचा तसेच आमच्या प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तनाला सामोरे जाण्यासाठी व्हॉट्स अॅपच्या स्वत:च्या प्रतिबंधात्मक कृतींचा समावेश आहे. लाखो भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांना सक्षम करण्यासाठी, केंद्र सरकारने अलीकडेच तक्रार अपील समिती स्थापन केली आहे.