किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.47°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– सर्वपक्षीय बैठकीत प्रल्हाद जोशी यांचे आवाहन,
नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – येत्या सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच पृष्ठभूमीवर शनिवारी सर्वपक्षीय बैठक झाली. सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्या, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीत केले.
हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चेसाठी यावेत, यावर या बैठकीत विचार करण्यात आला. फौजदारी कायदे बदलविण्यासाठी सरकार जी तीन विधेयके सादर करणार आहे, त्यांचे इंग्रजी नामकरण करण्यात यावे, अशी मागणी विरोधकांनी केली. सोबतच, वाढती महागाई, तपास संस्थांचा गैरवापर आणि मणिपूरमधील हिंसाचार यावरही चर्चा करण्याची आग्रही भूमिका विरोधकांनी मांडली.
बैठकीनंतर पत्रपरिषदेला संबोधित करताना प्रल्हाद जोशी म्हणाले की, देशहिताशी संबंधित सर्व मुद्यांवर सरकार चर्चेसाठी तयार आहे. तथापि, चर्चेसाठी पोषक वातावरण सभागृहात निर्माण करण्याची जबाबदारी विरोधकांची आहे. त्यांनी विनाकारण गोंधळ घालू नये, इतकीच आमची अपेक्षा आहे. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविणे, ही जशी सरकारची जबाबदारी असते, तशी ती विरोधकांचीही असते. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांनी ज्या काही सूचना केल्या, त्यांची सकारात्मक दखल सरकारने घेतली आहे. १९ विधेयके आणि दोन वित्तीय दस्तावेज विचाराधीन आहेत, असे जोशी यांनी सांगितले.
विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे
या बैठकीत विरोधी पक्षांनी चीनने भारताचा बळकावलेला भूभाग, मणिपूर हिंसाचार, वाढती महागाई, ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर आदी मुद्दे उपस्थित केले, अशी माहिती राज्यसभेतील विरोधी उपनेते प्रमोद तिवारी यांनी दिली.
असा आहे अधिवेशनाचा कार्यक्रम
सोमवार, ४ डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात एकूण १५ बैठका होणार असून, यात ब्रिटिशांच्या काळातील कायदे बदलविणार्या तीन महत्त्वाच्या विधेयकांसह काही अन्य विधेयकांवर चर्चा होणार आहे.