किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– गृहनिर्माण मंत्री हरदीप एस पुरी यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, (१७ नोव्हेंबर) – सिटीज २.० स्मार्ट सिटी अभियानाला पूरक ठरेल आणि आपल्या शहरांमधील कचरा व्यवस्थापनाच्या संपूर्ण मूल्य साखळीमध्ये नावीन्य आणण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाशी एकरूप होईल, असे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. सिटीज २.० हा नाविन्यपूर्ण, एकात्मिक आणि शाश्वत शहरांसाठी गुंतवणूक कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आहे. सिटीज २.० ला ३१ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
सेंद्रिय कचर्यापासून जैव-इंधन तयार करण्यासाठी गोबर धन मोहिमेशी संलग्न करणे हादेखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे पुरी यांनी आज सिटीज २.० चॅलेंजचा प्रारंभ करताना नमूद केले. त्यांनी स्मार्ट शहर अभियानाअंतर्गत सर्व १०० स्मार्ट शहरांना या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगाने अर्ज करण्याचे आवाहन केले आणि त्यांना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पूर्ण पाठिंब्याचे आणि मार्गदर्शनाचे आश्वासन दिले.
पुरी यांनी यावेळी सिटीज २.० कार्यक्रम आणि स्मार्ट शहर अभियानाला पाठिंबा देणार्या आंतरराष्ट्रीय भागीदारांचे आभार मानले. सिटीज २.० साठी एकूण निधीमध्ये फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी-एएफडी आणि केएफडब्ल्यू (प्रत्येकी १०० दशलक्ष युरो ) यांच्याकडून १,७६० कोटी किंवा २०० दशलक्ष युरो कर्जाचा समावेश आहे. या कार्यक्रमाला युरोपियन युनियनकडून १०६ कोटीचे (१२ दशलक्ष युरो ) तांत्रिक सहाय्य अनुदान देखील प्राप्त होईल.
या कार्यक्रमाला संबोधित करताना पुरी यांनी सिटीज १.० च्या कामगिरीवर प्रकाश टाकला, यामध्ये १,००० हून अधिक नवीन इलेक्ट्रिक वाहनांचा ; १०० किलोमीटरहून अधिक नॉन-मोटाराइज्ड वाहतूक मार्गिकेचा विकास; ७५० एकर पेक्षा जास्त हरित मोकळ्या जागेची निर्मिती; आणि १,४०० परवडणार्या घरांचे बांधकाम; ३५० शैक्षणिक सुविधा आणि ५१ आरोग्य सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या.
भारतातील नागरी क्षेत्राच्या होत असलेल्या वाढीवर आणि विकासावर सरकारचे लक्ष असल्याचे सांगून हरदीप पुरी पुढे म्हणाले की, देश आता जगातील सर्वात मोठा नियोजित शहरीकरण कार्यक्रम हाती घेत आहे. २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत शहरी विकासातील एकूण गुंतवणूक १० पटीने वाढून १८ लाख कोटींहून अधिक झाली आहे.
देशाच्या शहरी भागात चक्राकार अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या दिशेने सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना पुरी म्हणाले की, स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत आम्ही यापूर्वीच ११२ जैव -मिथेनेशन प्रकल्प, २,३९१ कचर्यापासून खत निर्मिती संयंत्र, ५५ कचर्यापासून निर्मिती ऊर्जा संयंत्रे, २,२८१ बांधकाम साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा केंद्र, ९७२ बांधकाम आणि बांधकामातील कचरा व्यवस्थापन संयंत्र आणि ३३५ घन आणि द्रव कचरा संसाधन व्यवस्थापन संयंत्रे उभारली आहेत. अमृत आणि अमृत २.० या योजनांद्वारे आपल्या शहरांनी पाण्याची सुरक्षितता निश्चित करत परिवर्तनात्मक प्रगती केली आहे. स्वच्छ भारत मोहिमेच्या दुसर्या टप्प्यात आपली शहरे कचरामुक्त होतील आणि देशातील सर्व कचर्याचे निराकरण करेल,असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत सर्व १०० एसपीव्ही सिटीज उपक्रमाअंतर्गत सहाय्य मिळविण्यास पात्र आहेत. एकात्मिक कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देणारे १८ नावीन्यपूर्ण प्रकल्प सहाय्य देण्यासाठी निवडले जातील. याअंतर्गत प्रत्येक प्रकल्पासाठी देण्यात येणारी सिटीज अनुदान रक्कम एकूण प्रकल्प खर्चाच्या ८० टक्के ते अधिकाधिक १३५ कोटी रुपये पर्यंत मर्यादित असेल(ईशान्येकडील आणि डोंगराळ राज्यांच्या बाबतीत एकूण प्रकल्प खर्चाच्या ९०%,).अतिरिक्त निधीची सोय,म्हणजे एकूण प्रकल्प खर्चाच्या २०% रक्कम ही निवडलेल्या शहरांच्या राज्य/स्थानिक सरकारांनी स्वतःच्या स्त्रोत निधीद्वारे ( ईशान्येकडील आणि डोंगराळ राज्यांच्या बाबतीत एकूण प्रकल्प खर्चाच्या १०%) तयार करायची आहे. स्मार्ट सिटीज एसपीव्हीनी २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज सिटीज मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म,(सीपीएम) द्वारे करणे आवश्यक आहे.