किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल-सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांची माहिती,
– वर्षभरात देशभर होणार,
नागपूर, (१५ मार्च) – रा.स्व. संघाचा कार्यविस्तार दिवसेंदिवस वाढतच असून येत्या वर्षभरात देशाच्या १०० टक्के भागात संघकार्य पोहोचलेले राहील, असा विश्वास रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी आज येथे व्यक्त केला. रा.स्व. संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा आजपासून रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात सुरू झाली. यासंबंधी माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांना दिली. अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, सह-प्रचार प्रमुख नरेंद्रकुमार व आलोककुमार उपस्थित होते. दीड हजार कार्यकर्ते या सभेत सहभागी झाले आहेत.
वर्ष २०१७ ते २०२४ दरम्यानच्या संघाच्या कार्याचा आढावा घेतला तर त्याची व्यापकता दिसून येते. देशातील ९९ टक्के जिल्ह्यांमध्ये संघाचे कार्य सुरू आहे. संघाच्या कार्य व्यवस्थेत देशात ४५ प्रांत, त्यानंतर विभाग, जिल्हा, खंड, अशी रचना आहे. अशा ९२२ जिल्ह्यांमध्ये ६५९७ खंडांत (तहसील) तसेच १२-१५ गावांचा समूह ज्याला मंडळ म्हणतात, अशा २७,७२० मंडळांमध्ये संघाच्या एकूण संख्या ७३,११७ दैनिक शाखा लागतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४,४६६ शाखांची वाढ झाली आहे. या शाखांमध्ये ६० टक्के विद्यार्थी व ४० टक्के नोकरी किंवा व्यवसाय करणार्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यामध्ये ४० वर्षांवरील प्रौढांची संख्या ११ टक्के आहे. साप्ताहिक मिलन संख्या २७,७१७ आहे. त्यापैकी ८४० मागील वर्षाच्या तुलनेत वाढ आहेत. संघ मंडळांची संख्या १०,५६७ आहे. नगरे व महानगरांच्या १० हजार वस्त्यांमध्ये ४३ हजार प्रत्यक्ष शाखा लागतात. संघाच्या संकेतस्थळावर २०१७ ते २०२३ या काळात दरवर्षी १ लाखांहून अधिक लोकांच्या विनंत्या संंघाला जुळण्यासाठी येत आहेत. जानेवारी व फेब्रुवारी २०२४ मधील या आकडेवारीत रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर दुप्पट वाढ झाली आहे.
महिला समन्वय
महिला समन्वयाच्या कार्यात राष्ट्र सेविका समिती व विविध संघटनांमध्ये सकि‘य महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ४४ प्रांतात ४६० महिला संमेलने झालीत. त्यात ५ लाख ६१ हजार महिलांनी सहभाग घेतला. संघाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहे. भारतीय चिंतन, सामाजिक परिवर्तनात महिलांचा सक्रि य सहभाग वाढावी, हा त्याचा उद्देश आहे. अहल्याबाई होळकर यांची जन्माचे त्रिशताब्दी वर्ष मे २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत साजरी केली जाणार आहे. अहल्याबाई होळकर यांनी देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केला. वंचितांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बरेच काम केले आहे, ज्याबद्दल समाजाला माहिती नाही. या वर्षी त्यांच्या योगदानाची माहिती संपूर्ण भारतात पोहोचवण्याच्या दृष्टीने योजनेवर कार्य सुरू आहे.
अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे संघाचा जनसंपर्क व्यापक झाला. अक्षत वितरण अभियानाद्वारे ५,७८,७७८ गावे आणि ४,७२७ नगरातील एकूण १९ कोटी, ३८ लाख, ४९ हजार ७१ कुटुंबांसोबत स्वयंसेवकांसह ४४ लाख ९८ हजार ३३४ रामभक्तांनी संपर्क साधला. या अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद व स्वागतामुळे लोकांमध्ये आमच्या विश्वासाला पुन्हा आश्वस्त केले असल्याचे डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.
संघ शिक्षा वर्गांत नवा अभ्यासक्रम
संघ शिक्षा वर्गाच्या रचनेत नवीन अभ्यासक‘म समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी ७ दिवसांचा प्राथमिक शिक्षावर्ग, २० दिवसांचे प्रथम द्वितीय वर्ष, २५ दिवसांचा तृतीय संघ शिक्षा वर्ग होत होता. आता नवीन रचनेत ३ दिवसांचा प्रारंभिक शिक्षा वर्ग, ७ दिवसांचा प्राथमिक शिक्षावर्ग, १५ दिवसांचा संघ शिक्षा वर्ग, २० व २५ दिवस, असे दोन कार्यकर्ता विकास वर्ग होतील. या वर्गांमध्ये विशेषतः व्यावहारिक प्रशिक्षणाचा समावेश असेल.
आगामी निवडणूक
निवडणुकीत शत-प्रतिशत मतदान व्हावे, अशी भूमिका संघाची आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही शत-प्रतिशत मतदान व्हावे, अशी जनजागृती संघ स्वयंसेवक घरोघरी जाऊन करतील, असे डॉ. मनमोहन वैद्य यांनी सांगितले.
उद्घाटन
रा.स्व. संघाच्या अ.भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन आज सकाळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रारंभी त्यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. जैन मुनी विद्यासागर महाराज, माजी मु‘यमंत्री मनोहर जोशी आदींसह विवध मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सहकार्यवाह होसबळे यांनी मागील वर्षभराचा कार्यवृत्तांत सादर केला.