किमान तापमान : 23.23° से.
कमाल तापमान : 23.72° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.23° से.
22.99°से. - 24.74°से.
रविवार, 12 जानेवारी घनघोर बादल22.18°से. - 25.29°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.33°से. - 26.94°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.75°से. - 25.03°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.26°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश24.45°से. - 26.41°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– तेलंगणा पोलिसांचा प्रयोग यशस्वी,
हैदराबाद, (१५ मार्च) – तेलंगणा पोलिसांकडून शत्रूच्या ड्रोनला रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या ड्रोनला एद्यादे यंत्र नाही, तर गरूड पक्षी रोखणार आहे. तेलंगणा पोलिसांनी एक ऐतिहासिक पाऊल टाकत या पक्ष्याला ड्रोनला रोखण्याचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. याची यशस्वी चाचणी करण्यात आली.
पुढच्या काळात धोकादायक ड्रोनचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित गरुड तैनात करण्याची योजना आहे. पोलिस अधिकार्यांच्या मते, या गरुडांना दररोज एक तासाचे प्रशिक्षण दिले जात होते. नेदरलँड, फ‘ान्स यासह युरोपियन देशांमध्ये अशा प्रकारचा उपाय योजिला जातो. आता युरोपियन देशाची प्रेरणा घेऊन गरुड पक्ष्याला शत्रूच्या ड्रोनला कसे रोखायचे, याबाबतचे प्रशिक्षण दिले गेले आहे. हे प्रशिक्षण मागील तीन वर्षांपासून देण्यात येत होते. अखेर तीन गरुड पक्षी यात यशस्वी झाले आहेत.
देशातील पहिलाच प्रयोग
तेलंगणातील हैदराबादच्या मोइनाबाद येथील इंटिग्रेटेड इंटेलिजेंस प्रशिक्षण अकादमीत पोलिस महासंचालक रवी गुप्ता आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या उपस्थितीत एका प्रशिक्षित गरुड पक्षाने एका ड्रोनला पाडले. गेल्या तीन वर्षांपासून या गरुड पक्षांना प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रशिक्षणात हे गरुड पक्षी यशस्वी ठरले आहेत. हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, अनेकदा राजकीय नेत्यांच्या व्हीव्हीआयपी भेटी, सार्वजनिक सभा आणि कार्यक्रमादरम्यान शत्रूच्या ड्रोनचा धोका असतो. मात्र, यासाठी आता या प्रशिक्षित गरुड पक्षांचा वापर करण्याची तेलंगणा पोलिसांची योजना आहे. हे प्रशिक्षित गरुड पक्षी अशा व्हीव्हीआयपी नेत्यांच्या भेटी, सार्वजनिक सभा आणि कार्यक्रमादरम्यान तैनात केले जाऊ शकतात.
प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ जारी
विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या तीन गरुड पक्षांपैकी एक गरुड पक्षी एका शेडवर बसलेला व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर एक ड्रोन अचानक आकाशात झेपावतो. यानंतर लगेच हा प्रशिक्षित गरुड त्या ड्रोनच्या दिशेने जाऊन त्याला पकडतो आणि खाली एका स्थळी घेऊन जातो. हे सर्व काम हा गरुड पक्षी अगदी अचूकपणे पूर्ण करतो. या तीन गरुडांपैकी दोन गरुडांचे वय दोन वर्षे तर दुसर्याचे वय दोन वर्षांपेक्षा थोडे जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.