किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकृषी कायदे मागे घेण्याची मागणी,
नवी दिल्ली, २२ जुलै – तीन कृषी कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी कॉंग्रेसच्या सदस्यांनी संसदभवन परिसरात आज निदर्शने केली.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या निदर्शनात लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी, मनीष तिवारी, गौरव गोगोई, रवनीतसिंह बिट्ठू, प्रतापसिंग बाजवा यांच्यासह अनेक कॉंग्रेस सदस्य सहभागी झाले. काळे कायदे मागे घ्या आणि पंतप्रधान न्याय द्या, अशा घोषणा कॉंग्रेसचे सदस्य देत होते.
कॉंग्रेस सदस्यांच्या हातात एक लांबलचक बॅनर होता. तीनही कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचे सांगत ते मागे घेण्याची मागणी यातून करण्यात आली. सरकार गरीब, मजूर आणि शेतकरीविरोधी असल्याचे फलक सदस्यांच्या हातात होते.
राजधानी दिल्लीच्या तीन सीमांवर जवळपास आठ महिन्यांपासून सुरू असलेले शेतकर्यांचे आंदोलन आजपासून संसदभवनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जंतरमंतर परिसरात आले आहे. त्या पृष्ठभूमीवर संसदभवन परिसरात शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.