किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलसरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
गुवाहाटी, २१ जुलै – नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) या दोन्ही विषयांना केवळ राजकीय फायद्यासाठी हिंदू आणि मुस्लिम असा मुद्दा बनविण्यात आला. हा हिंदू आणि मुस्लिम असा विषयच नाही. आपल्या देशाचा नागरिक कोण आहे, हे माहीत करण्याची प्रत्येक देशाची एक पद्धत असते. त्याचाच एनआरसी हा एक भाग आहे. ही प्रक्रिया कुणाच्याही विरोधात नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज बुधवारी येथे केले.
संघाचे कार्य करणार्या आमच्या लोकांच्या मनात सर्वांच्याच कल्याणाची भावना आहे. सत्याच्या मार्गावर चालण्याचा आमचा संकल्प असतो, असे सरसंघचालकांनी ‘सिटीझनशिप डिबेट ओव्हर एनआरसी ऍण्ड सीएए; आसाम ऍण्ड दर पॉलिटिक्स ऑफ हिस्टरी’ या पुस्तकाचे विमोचन करण्यासाठी आयोजित समारंभात बोलताना सांगितले.
सीएए आणि एनआरसी कोणत्याही भारतीय नागरिकाच्या विरोधात तयार करण्यात आलेला कायदा नाही. भारताचे नागरिक असलेल्या मुस्लिमांना सीएएमुळे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या पुस्तकाचा एक निष्कर्ष आहे आणि तो आपल्या सर्वांसमोर आला आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवरून गोंधळ निर्माण करण्याची पद्धत आहे. आता तर या पुस्तकावरूनही गोंधळ निर्माण केला जाऊ शकतो. लेखकाने काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल, तेव्हा तुमच्या लक्षात सर्व काही येईल. आतापर्यंत ज्या गोष्टी आपल्यासमोर आल्या नाहीत किंवा येऊ दिल्या गेल्या नाहीत, अशा गोष्टी या पुस्तकात आहेत, असे मोहनजी म्हणाले.
आम्हाला जगातील कोणत्याही भाषेशी, धर्माशी किंवा कोणत्याही गोष्टीशी समस्या नाही. कारण, आमचे धोरण ‘वसुधैव कुटुंबकम्’ आहे. आमच्या देशात किती वेगवेगळे राज्य होते. मात्र, व्हिसा, पासपोर्ट काहीच नव्हते. तरीदेखील यात्रा होत होत्या. हिमालयापासून कन्याकुमारी, कच्छपासून कामरूपपर्यंत लोकांची ये-जा सुरू होती. कारण, आमच्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राज्य आहे, देश आहे. आम्ही ‘स्वदेशोभुवनत्रयः’ हा सिद्धांत मानतो आणि हीच आमची विचारधारा आहे, असे विचार त्यांनी मांडले.
देशात १९३० पासून योजनाबद्ध रीतीने मुस्लिमांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न झाले. याचे कारण जसे सांगण्यात आले तसे भीतीचे होते की आणखी काही वेगळे होते. आर्थिक गरज होती, हेदेखील कारण नव्हते, लोकसंख्या वाढविण्याचा तो एक सुनियोजित विचार होता. आपली लोकसंख्या वाढवायची आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करून, भारताला पाकिस्तान बनवायचे, हा त्यामागील विचार होता.
ही आहे आमची संस्कृती
आपल्या देशात आधीपासूच धार्मिक स्वातंत्र्य आहे. आम्ही परमेश्वराला एकाच रूपात पाहातो, कुणी त्याला दुसर्या रूपात पाहात असेल. आमच्या भक्तीत आम्ही ठाम आहोत, तुमच्या भक्तीत तुम्ही ठाम आहात. एकमेकांच्या भाषेचा आदर, सन्मान करून आपण एकत्र राहूया. या गोष्टी सारेच करतात, त्या आदर्श म्हणून केल्या जातात. मात्र, या आदर्शावर प्रत्यक्ष कृती फक्त भारताच्या पारंपरिक संस्कृतीचे पालन करणारी व्यक्तीच करू शकते आणि हीच आमची संस्कृती आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.