किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 31°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– सूत्रधाराला अटक करण्यासाठी शोधमोहीम,
नवी दिल्ली, (१४ डिसेंबर) – संसदेच्या सुरक्षेत झालेल्या चूक प्रकरणी आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कटातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी विविध राज्यांमध्ये व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी गुरुवारी दिली.
दहशतवादी कृत्य, देशाविरोधात कट रचणे, फौजदारी कट, दंगली घडविण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे आरोपींवर ठेवण्यात आले आहेत, असे दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने सांगितले. या प्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनिश दयालसिंह यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन केली आहे, ज्यात इतर सुरक्षा संस्था आणि तज्ज्ञ सदस्य आहेत. चौकशी समिती संसद सुरक्षेच्या भंगाच्या कारणांची चौकशी करेल आणि त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल.
मुख्य सूत्रधार फरार
संसद भवनात गोंधळ निर्माण करण्याच्या उद्देशाने सहा जण आले होते. या सर्वांचा म्होरक्या ललित झा असून, तो सध्या फरार आहे. अमोल शिंदे आणि नीलम सिंह जेव्हा संसदेबाहेर स्मोक कँडल फवारत होते, तेव्हा ललित त्यांचा व्हिडीओ काढत होता. अमोल आणि नीलमला पकडल्यावर ललित पळून गेला. या चौघांचे फोन ललितकडे आहेत. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
आठ कर्मचारी निलंबित
संसदेतील सुरक्षा भंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई करीत, आठ कर्मचार्यांना निलंबित केले आहे. या सर्व कर्मचार्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विनित आणि नरेंद्र अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
संसदेच्या सुरक्षेत वाढ
बुधवारच्या घटनेनंतर संसद आणि आसपासच्या परिसरातील सुरक्षेत अभूतपूर्व अशी वाढ करण्यात आली आहे. सर्व प्रवेश द्वारांवर सशस्त्र जवानांना तैनात करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.